Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात

पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन्सी करताना रिषभ पंतही टॉसवेळी कमनशिबी ठरला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 08:43 IST

Open in App

India vs South Africa 2nd Test : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. मैदान बदलले कॅप्टन बदलला पण टॉस वेळी पुन्हा टीम इंडियाच्या पदरी निराशाच आली. पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन्सी करताना रिषभ पंतही टॉसवेळी कमनशिबी ठरला.  दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावरील पराभवानंतर भारतीय संघासमोर आता मालिका वाचवण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ २५ वर्षांनी भारतीय मैदानात मालिका विजयासाठी प्रयत्नशील असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघात दोन बदल; दक्षिण आफ्रिकेचा संघ एका बदलासह उतरला मैदानात

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात बदल होणार हे निश्चित होते. नाणेफेकीनंतर रिषभ पंतन संघ दोन बदलासह मैदानात उतणार असल्याचे स्पष्ट केले. नितीश कुमार रेड्डीसह साई सुदर्शनची संघात एन्ट्री झाली आहे. अक्षर पटेलला बाकावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कॉर्बिन बॉशच्या जागी सेनुरन मुथुसामी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन (Team India Playing XI)

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन (South Africa Playing XI)

रायन रिकेल्टन, एडन मार्करम, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (WK), मार्को यान्सेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs SA 2nd Test: India lost toss, two changes made.

Web Summary : South Africa won the toss and chose to bat in the second Test. India, aiming to save the series, included Sai Sudharsan and Nitish Kumar Reddy, replacing Shubman Gill and Axar Patel in the playing eleven. Pant will captain the side.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंत