IND vs SA 2nd Test Rishabh Pant On One Off Test Captaincy : गुवाहाटीच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या जागी रिषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विकेट किपर बॅटरच्या रुपात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंह धोनीनंतर तो दुसरा भारतीय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढती आधी रिषभ पंतनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकमेवर कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणं ही आदर्श परिस्थिती नाही. पण हा क्षण निश्चितच अभिमानस्पद वाटतो, असे म्हटले आहे. गिलच्या जागी कोण असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने उत्तर दिले पण नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत कसोटीत पहिल्यांदाच करणार भारतीय संघाच नेतृत्व, म्हणाला...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला शुभमन गिलच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. मानेच्या दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी उप कर्णधार रिषभ पंत याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या सामन्याआधी रिषभ पंत म्हणाला की, "एकमेव कसोटी हा कर्णधारासाठी सर्वोत्तम पर्याय नाही, पण बीसीसीआयने मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी आभारी आहे. हा क्षण अभिमानास्पद आहे. कधी कधी मोठ्या प्रसंगी अधिक विचार केल्याने फायदा होत नाही. अति विचार करण्यापेक्षा जिंकण्यासाठी जे करायला हव त्यावर भर देणार आहोत." असे तो म्हणाला आहे.
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
गिलच्या जागी कुणाला खेळवायचं ते ठरलं, पण...
शुभमन गिलच्या जागी रिषभ पंत कर्णधार होणार हे पक्के होते. कारण तो संघाचा उप कर्णधार आहे. आता गिलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? ते पाहण्याजोगे असेल. यासंदर्भातील पंतला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, शुभमनच्या जागी याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्याला संधी मिळणार आहे त्याला त्याची जबाबदारी काय ते चांगलेच माहिती आहे.