India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. लोकेशच्या अर्धशतकानंतर अश्विनच्या ४६ धावांनी टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली. ५ बाद ११६ अशी अवस्था असताना अश्विन मैदानावर उतरला अन् दमदार खेळ केला आणि भारतानं २०२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या असून अजून ते १६७ धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या दिवसावर यजमानांनी वर्चस्व गाजवलेलं असताना टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs SA, 2nd Test Live Updates : भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांना झालीय दुखापत, दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना एकानं सोडलं मैदान
IND vs SA, 2nd Test Live Updates : भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांना झालीय दुखापत, दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना एकानं सोडलं मैदान
India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:49 IST