७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:08 PM2024-01-03T21:08:22+5:302024-01-03T21:08:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : 23 wickets today is the second most to fall on the opening day of a Test match, break 134 years old record, STUMPS, DAY 1 - SA trail by 36 runs | ७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 2nd Test  (Marathi News) :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत. दोन्ही संघांचा पहिला डाव गडगडला असून यजमान दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही घसरगुंडी झालेली पाहायला मिळतेय. मुकेश कुमारने दोन धक्के दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर आफ्रिकेला दुसऱ्या डावातील तिसरा धक्का दिला. बुमराहने ही विकेट घेताच कसोटी क्रिकेटमधील १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला. 

Image
मोहम्मद सिराजच्या ( ६-१५) भेदक माऱ्याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार ( प्रत्येकी २ विकेट्स) यांच्या मिळालेली साथ दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळण्यासाठी पुरेशी ठरली. पण, भारताची अवस्थाही काहीशी तशीच झाली. रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) यांच्या खेळीनंतरही भारताला पहिल्या डावात १५३ धावा करता आल्या. ४ बाद १५३ धावांवरून भारताने सहा फलंदाज एकही धाव न करता गमावले. नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

 
भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( १२) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मुकेश कुमारने ही विकेट मिळवून दिली. मुकेशने त्याच्या पुढच्या षटकात आफ्रिकेच्या टॉनी जॉर्जीला बाद करून दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम चेंडूवर त्रिस्तान स्टब्स ( १) माघारी परतला आणि आफ्रिकेला ४५ धावांवर तिसरा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीच्या एका दिवसात २३ विकेट्स पडण्याची ही दुसरी वेळ ठऱली. २०११ मध्ये आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २३ विकेट्स पडल्या होत्या. १८९६मध्ये आफ्रिका वि. इंग्लंड यांच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २१ विकेट्स पडलेल्या आणि आज हा विक्रम तुटला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक विकेट्स पडल्याची ही दुसरी वेळ ठरली. 


कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक २५ विकेट्स पडल्याचा विक्रम १९०२ मध्ये घडलेला.  ऑस्ट्रेलियाच्या १५ ( १०-११२ व ५-४८) आणि इंग्लंडच्या ( १०-६१) अशा मिळून १५ विकेट्स पडल्या होत्या. आज  २३ विकेट्स पडल्या आणि १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला. १८९० मध्ये इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या दिवशी २२ विकेट्स पडलेल्या. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेच्या ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या आणि आफ्रिका ३६ धावांनी पिछाडीवर आहे.

 

Web Title: IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : 23 wickets today is the second most to fall on the opening day of a Test match, break 134 years old record, STUMPS, DAY 1 - SA trail by 36 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.