IND vs SA, 2nd Test Live Updates : कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू जसप्रीत बुमराहनं स्टेडियममध्ये भिरकावला, पत्नी संजना गणेसननं जोरात टाळ्या वाजवल्या, Video

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव २०२ धावांवरच गडगडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:20 PM2022-01-04T15:20:01+5:302022-01-04T15:22:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah’s stunning six off Kagiso Rabada leaves wife Sanjana Ganesan all smiling, Video | IND vs SA, 2nd Test Live Updates : कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू जसप्रीत बुमराहनं स्टेडियममध्ये भिरकावला, पत्नी संजना गणेसननं जोरात टाळ्या वाजवल्या, Video

IND vs SA, 2nd Test Live Updates : कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू जसप्रीत बुमराहनं स्टेडियममध्ये भिरकावला, पत्नी संजना गणेसननं जोरात टाळ्या वाजवल्या, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव २०२ धावांवरच गडगडला. कर्णधार लोकेश राहुल ( ५०) व आर अश्विन ( ४६) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं समाधानकारक पल्ला गाठला. जसप्रीत बुमराहनं एक षटकार व एक चौकार खेचताना नाबाद १४ धावा करताना भारताला दोनशेपार नेले. कागिसो रबाडानं टाकलेला वेगवान चेंडू जेव्हा जसप्रीतनं स्टेडियमपार पाठवला त्यावेळेस उपस्थित असलेली त्याची पत्नी संजना गणेसन हिची रिअ‍ॅक्शन भारी होती. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मयांक अग्रवाल ( २६), चेतेश्वर पुजारा ( ३) व अजिंक्य रहाणे ( ०) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलनं हनुमा विहारीसह डाव सावण्याचा प्रयत्न केला. पण, विहारी ( २०) धावांवर माघारी परतला अन् लोकेशही ( ५०) अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर आर अश्विन व रिषभ पंत यांनी  चांगला खेळ केला, परंतु रिषभला फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. अश्विननं मात्र ५० चेंडूंत ४६ धावा चोपल्या. जसप्रीतनं नाबाद १४ धावा करून संघाला दोनशेपार नेले.       

पाहा व्हिडीओ.


 दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही. मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. रिषभ पंतनं आफ्रिकेच्या पीटरसननं १२ धावांवर असताना जीवदान दिले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उडालेला झेल रिषभकडून  सुटला. आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या होत्या. त्यात दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला. 

Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah’s stunning six off Kagiso Rabada leaves wife Sanjana Ganesan all smiling, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.