Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान

स्टब्सचं शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं, जड्डूनं त्याला बोल्ड करताच टेम्बा बावुमानं दुसरा डाव केला घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:49 IST

Open in App

गुवाहाटी कसोटी सामन्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघासमोर ५४९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. रवींद्र जडेजानं ट्रिस्टन स्टब्सला ९४ धावांवर बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २६० धावांवर पाचवा धक्का दिला. ही विकेट पडताच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने दुसरा डाव घोषित केला. तिसऱ्या सत्रातील चौथ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या संघान ५ बाद २६० धावांवर डाव घोषित करत टीम इंडियासमोर ५४९ धावांचे टार्गेट सेट केले आहे.कोलकाताच्या मैदानात लो स्कोअरिंग लढत जिंकत मालिकेत आघाडी घेतलेल्या टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुवाहाटीच्या मैदानात पहिल्यांदाच रंगलेल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव २०१ धावांत आटोपून पाहुण्या संघाने सामन्यात २८८ धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियाला फॉलोऑन न देता दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा फलंदाजीला उतरला. 

  या धावांचा पाठलाग करणं आता टीम इंडियासाठी अशक्यच आहे. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका जवळपास गमावल्यात जमा आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राखून क्लीन स्वीप टाळण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa sets improbable target; India faces uphill battle to save test.

Web Summary : South Africa set India a daunting 530-run target in the second test. After dominating, South Africa declared at 248/5 on day four, leaving India with a near-impossible chase. India now fights to avoid a series whitewash.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका