IND vs SA 2nd Test South Africa Declared 260 Now India Need 549 To Win In Guwahati : गुवाहाटी कसोटी सामन्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघासमोर ५४९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. ज्या स्टब्सच्या शतकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने डाव घोषित करण्यास विलंब लावला त्याला रवींद्र जडेजानं ९४ धावांवर बोल्ड केले. ही विकेट पडताच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५ बाद २६० धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. भारतीय संघाला विजयासाठी जे आव्हान मिळालं आहे ते अशक्यप्राय असं असून मालिका जवळपास टीम इंडियाच्या हातून निसटली आहे. मालिकेत बरोबरीसाठी गुवाहाटीच्या मैदानता उतरलेल्या टीम इंडियासमोर दुसरा कसोटी सामना वाचवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं टीम इंडियाला फॉलोऑन न देता खेळला मोठं टार्गेट सेट करण्याचा डाव
कोलकाताच्या मैदानात लो स्कोअरिंग लढत जिंकत मालिकेत आघाडी घेतलेल्या टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुवाहाटीच्या मैदानात पहिल्यांदाच रंगलेल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव २०१ धावांत आटोपून पाहुण्या संघाने सामन्यात २८८ धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियाला फॉलोऑन न देता दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा फलंदाजीला उतरला. ५ बाद २६० धावा करत ५४८ धावांच्या मजबूत आघाडीसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामना गमावणार नाही हे निश्चित केले आहे.
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
स्टब्सचं शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं, गोलंदाजीत टीम इंडियाकडून जड्डूचा 'चौकार'
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या सघाकडून स्टब्सनं १८० चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्याम दतीने सर्वाधिक ९४ धावा केल्या. टोनी डी झोर्झी याने ६८ चेंडूत केलेल्या ४९ धावांशिवाय मुल्डरनं ६९ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. सलामीर रायन रिकल्टन ३५ (६४) आणि मार्करमन २९ (८४) दुहेरी आकडा गाठत दुसऱ्या डावात संघाल चांगली सुरुवात करून दिली. टेम्बा बुवमा फक्त ३ धावा करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करणं टीम इंडियासाठी अशक्यच आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना अनिर्णित राखून क्लीन स्वीप टाळण्यासाठी तगडी फलंदाजी करून दाखवावी लागेल.