Join us

IND vs SA, 2nd T20I Live Updates :एअरपोर्टवर सिक्युरिटीने हटकले, पठ्ठ्याने २३,४०० रुपये मोजले; विराटसोबत सेल्फीसाठी असली शक्कल लढवली की...

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : आपल्या आवडत्या खेळाडूसाठी चाहत्यांनी हद्द ओलांडल्याचे अनेकदा पाहायला, वाचायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 17:14 IST

Open in App

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : आपल्या आवडत्या खेळाडूसाठी चाहत्यांनी हद्द ओलांडल्याचे अनेकदा पाहायला, वाचायला मिळाले आहे. अशाच एका फॅन्सने विराट कोहलीसोबतच्या ( Virat Kohli) एका सेल्फीसाठी तब्बल २३,४०० रुपये मोजल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या ट्वेंटी-२० त भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने मालिकेतून माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजची निवड केली गेली. मागील दोन दिवस भारतीय खेळाडू गुवाहाटी येथे कसून सराव करत आहेत. 

गुवाहाटीत सर्वकाही नाही 'ओके'? रोहित शर्मा आज पोहोचला, दोन्ही सराव सत्रांनाही मुकला

गुवाहाटी येथील शांतीपूर येथील राहुल राय ( Rahul Rai) या युवकाने विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी २३ हजार रुपये मोजले. गुवाहाटी एअरपोर्टवर सुरक्षारक्षकांनी त्याला विराटसोबत सेल्फी काढण्यापासून रोखले होते आणि त्यानंतर त्याने टीम इंडिया ज्या  हॉटेलमध्ये थांबलीय तेथे रुम बुक केला. दुसऱ्याच दिवशी त्याची कोहलीशी भेट झाली आणि ब्रेकफास्ट करताना सेल्फीही घेतली. २९ सप्टेंबरला भारतीय खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आणि त्यावेळी राहुल सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले. 

'' मी विमानतळावर गेलो होतो. तेथे मला विराट कोहली दिसला, परंतु सुरक्षा रक्षकांनी विराटजवळ जाऊ दिले नाही. पुढील काही दिवस विराट कोहली याच शहरात आहे, हे मला माहित होते आणि त्यामुळे सराव सत्रात मी पुन्हा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु येथेही सुरक्षा रक्षकांनी हटकले. मला माझ्या हिरोसोबत सेल्फी घ्यायची होती,''असे राहुल रायने News18 ला सांगितले.  

पण, त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे, त्यात त्याने रूम बुक केले. या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक रात्री राहण्यासाठी त्याने २३,४०० रुपये मोजले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना त्याला विराट दिसला. पण, सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. तेव्हा त्याने शक्कल लढवली. हॉटेल कर्मचाऱ्यांसमोर आजारी असल्याचं नाटक करून भूक लागल्याचे त्याने सांगितले. तेव्हा त्यांनी ब्रेकफास्ट लाऊंजमध्ये त्याला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा कोहलीचंही त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने सेल्फी काढण्यास परवानगी दिली. राहुल रायने विराटला एक गिफ्टही दिलं, परंतु कोहलीने ते घेण्यास नकार दिला. त्याने त्या फोटो फ्रेमवर ऑटोग्राफ दिला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीऑफ द फिल्डगौहती
Open in App