Join us

IND vs SA, 2nd T20I Live Updates : रोहित शर्माने इतिहास रचला; नाणेफेकीचा कौल आफ्रिकेच्या बाजूने लागला, पाहा संघात काय बदल झाला

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 18:37 IST

Open in App

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताला घरच्या मैदानावर एकदाही आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकता आलेली नाही. पण, रोहित शर्मा अँड टीमला आजची लढत जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. पहिल्या ट्वेंटी-२० त भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने मालिकेतून माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजची निवड केली गेली. पण, प्लेइंग इलेव्हनचा फैसला वेगळा झालाय...

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवनकडे नेतृत्व; वर्ल्ड कपसाठी निवडलेला खेळाडूही संघात

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल केलेला नाही. आफ्रिकेच्या संघात तब्रेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी खेळणार आहे. 

भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिकेचा संघ -  टेम्बा बवुमा, क्विंटन डी कॉक, रिली रोसोवू, एडन मार्कराम, डेव्हिड मिरल, क्षिस्तान स्टब्स, वेन पार्नेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, लुंगी एनगीडी 

रोहित शर्माचा आजचा ४०० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि एवढे ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आहे. रोहितने मुंबई इंडियन्सकडून १९१, भारताकडून १४१, डेक्कन चार्जर्सकडून ४७, मुंबईकडून १७  आणि इंडियन्सकडून २ व इंडिया ए कडून २ सामने खेळले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मागौहती
Open in App