India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका याच्यांतला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज गुवाहाटीच्या बसपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताला घरच्या मैदानावर एकदाही आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकता आलेली नाही. पण, रोहित शर्मा अँड टीमला आजची लढत जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. रोहितने आज ४ धावा करताच एका कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त ५००+ धावा करणारा भारताचा पहिला कर्णधार ठरेल. पण, सामना सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना रोहित ( Rohit Sharma) गुवाहाटी येथे दाखल झाला. तिरुअनंतपूरम येथून भारतीय खेळाडू २९ तारखेलाच गुवाहाटी येथे पोहोचले, परंतु रोहित आज आल्याने सर्वकाही 'OK' नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
IND vs SA, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याची वेळ बदलणार; जाणून घ्या IMP अपडेट्स
पहिल्या ट्वेंटी-२० त भारताने सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने मालिकेतून माघार घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजची निवड केली गेली. मागील दोन दिवस भारतीय खेळाडू गुवाहाटी येथे कसून सराव करत आहेत. पण, कर्णधार रोहितला सराव सत्रासह सामन्यापूर्वीची पत्रकार परिषदेतही हजर राहता आलेले नाही. त्याने दोन्ही सराव सत्र चुकवले आणि आज सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी तो गुवाहाटीत दाखल झाला. त्याने काही वैयक्तिक कारणामुळे टीम इंडियासोबत प्रवास केला नाही. सुदैवाने दुखापत किंवा अन्य काही वादाचा मुद्दा रोहितच्या या उशीरा येण्यामागे नाही.
भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ - टेम्बा बवुमा, क्विंटन डी कॉक, रिली रोसोवू, एडन मार्कराम, डेव्हिड मिरल, क्षिस्तान स्टब्स, वेन पार्नेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, तब्रेझ शम्सी.
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट
गुवाहाटी येथे आज सायंकाळी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे, परंतु ७ नंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यादरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत जर मैदान वेळेत सुकवता आले नाही, तर सामना रद्द करावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. याआधी २०२०मध्ये भारत-श्रीलंका यांच्यातला सामना ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करावा लागला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"