Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात ९३ धावांत आटोपला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:26 IST

Open in App

India vs South Africa, 1st Test :  टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघाने दमदार कमबॅक करून दाखवत घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत केले आहे. कोलकाताच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामना ३० धावांनी जिंकत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना तिसऱ्या दिवशी संपणार हे पक्के होते, पण सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. पण पाहुण्या संघाने कमालीच्या कामगिरीसह १५ वर्षांनी टीम इंडियात कसोटी जिंकण्याचा डाव साधला. या विजयासह टेम्बा बावुमाचा एकही कसोटी सामना न गमावण्याचा रेकॉर्ड कायम राहिला.   

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात १५९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात १८९ धावा करत पहिल्या डावातील खेळानंतर ३० धावांची अल्प आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १५३ धावा करत टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात ९३ धावांत आटोपला. टीम इंडियाने जेवढ्या धावांची आघाडी घेतली तेवढ्याच धावांनी संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर पडणं हे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले.  

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa stuns India in low-scoring Test, clinches victory!

Web Summary : South Africa defeated India by 30 runs in the first Test. Despite India's initial lead, South Africa set a 124-run target, bowling India out for 93 in the second innings, securing a 1-0 series lead.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिल