Shubman Gill Injury Update : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. फलंदाजांसाठी आव्हानात्मक असलेल्या खेळपट्टीवर कसोटीमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलवर ३ चेंडूचा सामना करून एका चौकाराच्या मदतीने ४ धावा करुन मैदान सोडण्याची वेळ आली. शुभमन गिल पहिल्या डावात फलंदाजीला येईल, अशी अपेक्षा होती. पण तो पुन्हा मैदानात उतरलाच नाही. परिणामी भारताचा पहिला डाव १८९ धावांवर नववी विकेट पडल्यावरच संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून उप कर्णधार रिषभ पंत कार्यवाही कर्णधाराच्या रुपात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात शुभमन गिलसंदर्भात बीसीसीआयनं काय म्हटलंय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिलच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयने दिली माहिती
बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीची माहिती दिली आहे. मान लचकली असून तो BCCI मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे. त्याच्या खेळण्यासंदर्भातील निर्णय हा दुखापतीच्या प्रगतीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. पहिल्या डावातील खेळ संपल्यानंतर तो मैदानात उतरला नसल्यामुळे आता दुसऱ्या डावात बॅटिंगची वेळ आल्यावर तो खेळणार की, नाही यासंदर्भात शंका निर्माण झाली आहे.
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
स्लॉग स्वीप खेळताना लचकली मान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात लोकेश वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसल्यावर कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. त्याने एक चौकारही मारला. पण सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप खेळताना त्याची मान लचकली. वेदननं व्याकूळ होऊन त्याने मैदान सोडण्याा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.
गिलच्या जागी उप कर्णधार पंतवर कॅप्टन्सीची जबाबदारी
दुखापतीमुळे शुभमन गिलनं मैदान सोडल्यावर रिषभ पंत कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात संघाचे नेतृत्व करत आहे. पंतनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २४ चेंडूत २७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावानंतर ३० धावांची अल्प आघाडी घेतली आहे. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे दुसऱ्या डावात शुभमन गिल फिट झाला नाही तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.