IND vs SA 1st Test, Kuldeep Yadav Gets Temba Buvuma Wicket After Rishabh Pant Tips : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमानं नाणेफेक जिंकली. पण त्यानंतर त्याने जो निर्णय घेतला तो भारतीय गोलंदाजांनी फसवा ठरवला. जसप्रीत बुमराहने धक्क्यावर धक्के देत दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडल्यावर फिरकीपटू कुलदीप यादव पिक्चरमध्ये आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतनं फिल्डिंग सेट केली अन् कुलदीपच्या खात्यात जमा झाली विकेट
कुलदीप यादवनं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला स्वस्तात माघारी धाडले. ही विकेट कुलदीपच्या खात्यात जमा झाली. पण या विकेटचं खरं श्रेय हे पंतनं विकेटमागून 'बोलंदाजी' करणाऱ्या रिषभ पंतचे होते. उप कर्णधारानं फिल्डिंग लावून बावुमाला माघारी धाडल्याचे पाहायला मिळाले.
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
काय म्हणाला पंत? बावुमाच्या विकेटआधी पंतची विकेटमागील 'बोलंदाजी' चर्चेत
रिषभ पंत विकेट मागे नेहमीच आपल्या बडबडीमुळे चर्चेत असतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही तो आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहित करताना दिसून आले. कुलदीप यादवला त्याने दिलेला सल्ला आणि बावुमाच्या विकेटसाठी त्याने फिल्डिंग सेटपसह विणलेले जाळे चर्चेचा विषय ठरत आहे. बावुमा एकेरी धाव घेणार नाही तो स्विप खेळण्यावर भर देईल, असे सांगत पंतनं कुलदीपच्या गोलंदाजीवेळी ध्रुव जुरेल याला लेग स्लिपला उभे केले. इथेच तो कॅच देईल, असे पंत म्हणाला. पंतच्या विकेटमागील या 'बोलंदाजी'नंतर बावुमानं स्विप खेळणं टाळलं. पण एकेरी धाव घेण्याच्या नादात तो ध्रुव जुरेलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. ११ चेंडूचा सामना करून तो फक्त ३ धावा करून माघारी फिरला.
पंतच कमबॅकसह टीम इंडियाची एनर्जी वाढली
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यात दुखापतीमुळे रिषभ पंत भारतीय संघातून आउट झाला होता. दक्षिण आफ्रिका 'अ' विरुदधच्या लढतीसह त्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. कोलकाताच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याचे विकेट मागील तेवर पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा अख्खा संघ एकाच पॅटर्नमध्ये खेळतो, असे सांगत गोलंदाजांना तो टिप्स देताना दिसला. त्याची विकेटमागील त्याचा हा तोरा टीम इंडियाची एनर्जी वाढवणारी अशीच आहे.