IND vs SA 1st Test, Jasprit Bumrah: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या दिवसाच्या खेळात आफ्रिकेचे दोन बळी टिपत दिवसाचा खेळ संपवला. ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर ९४ धावांत ४ बळी गमावले. त्यापैकी जसप्रीत बुमराहने वॅन डर डुसेनची घेतलेली विकेट ही विशेष चर्चेत राहिली.
जसप्रीत बुमराहने पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच षटकं शिल्लक असताना बुमराहला परत बोलवण्यात आले. त्यावेळी वॅन डर डुसेन खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्याची विकेट काढणं हाच भारतापुढचा पेच होता. पण बुमराहने त्या वेळी आपली स्मार्ट गोलंदाजी दाखवत त्याचा त्रिफळा उडवला. बुमराहने वॅन डर डुसेनला सतत ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली. त्यामुळे एक चेंडू बॅटने न खेळता सोडून देण्याचा विचार फलंदाजाच्या मनात आला. पण नेमका बुमराहने तोच चेंडू इनस्विंग केला. त्यामुळे फलंदाजालाही चेंडू कळला नाही अन् तो क्लीन बोल्ड झाला.
पाहा व्हिडीओ-
--
--
--
दरम्यान, आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या डावाची खराब सुरूवात झाली. सलामीवीर मार्करम एक धाव काढून बाद झाला. पीटरसन (१७) आणि वॅन डर डुसेन (११) हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. दिवसाच्या खेळाचा काही वेळ उरलेला असल्याने नाईट वॉचमन केशव महाराजला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. पण बुमराहने त्याला अप्रतिम यॉर्कर टाकत त्याला माघारी धाडले. कर्णधार डीन एल्गरने मात्र एकतर्फी झुंज देऊन ५२ धावांची खेळी केली. आता पाचव्या दिवशी त्याच्यावर संघाची बरीचशी मदार आहे.
Web Title: IND vs SA 1st Test Live Updates Jasprit Bumrah Smart Bowling South Africa Batter Van Der Dussen Fooled Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.