Join us

India vs South Africa 1st Test: 'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; शेवटच्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांचा लागणार कस

३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 22:11 IST

Open in App

IND vs SA 1st Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयापासून सहा पावलं दूर आहे. चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने दोन तर शमी आणि सिराजने एक-एक बळी टिपले. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारतीय संघाला सहा गडी बाद करून विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, आफ्रिकन कर्णधार डीन एल्गर हा नाबाद ५२ धावांवर खेळत एका बाजून किल्ली लढवतोय. त्यामुळे सामन्याच्या शेवटच्या दिवशी संघाचा पराभव टाळण्यासाठी झुंजार फलंदाजी करण्याचे आव्हान त्याच्यापुढे असणार आहे.

भारताने दुसऱ्या डावाअंती १७४ धावा केल्या आणि आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांच्या डावाची खराब सुरूवात झाली. सलामीवीर एडन मार्करम एका धावेवर बाद झाला. पीटरसन (१७) आणि वॅन डर डुसेन (११) दोघे थोडा काळ संघर्ष करून माघारी परतले. दिवसाचे शेवटचे काही चेंडू खेळून काढण्यासाठी नाईट वॉचमन केशव महाराजला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. पण बुमराहच्या स्मार्ट गोलंदाजीमुळे तो बाद झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. कर्णधार डीन एल्गर मात्र एकतर्फी झुंज देत ५२ धावांवर खेळत आहे.   

त्याआधी, भारताचा दुसरा डाव १७४ धावांतच आटोपला. सलामीवीर मयंक अग्रवाल ४ तर लोकेश राहुल २३ धावांवर बाद झाला. शार्दूल ठाकूरही १० धावांवर माघारी परतला. त्यानंतर डावाला गळती लागली. विराट कोहली १८, चेतेश्वर पुजारा १६, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन १४, मोहम्मद शमी १, ऋषभ पंत ३४ आणि जसप्रीत बुमराह ७ धावांवर माघारी परतले. नवखा मार्को जेन्सन आणि कगिसो रबाडा या दोघांनी ४-४ तर लुंगी एन्गीडीने २ बळी टिपले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहविराट कोहलीअजिंक्य रहाणे
Open in App