Join us

IND vs SA 1st T20I Live Updates : भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी स्वीकारली; जसप्रीत बुमराहसह संघात चार बदल

India vs South Africa 1st T20I Live Updates : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा अँड टीम आजपासून दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-२०त सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 18:40 IST

Open in App

India vs South Africa 1st T20I Live Updates : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा अँड टीम आजपासून दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-२०त सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली गेली आहे. त्यात टेंशन वाढवणारी बातमी म्हणजे मोहम्मद शमी अजूनही कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला नाही आणि दीपक हुडाने दुखापतीमुळे माघार घेतलीय. उमेश यादव, श्रेयस अय्यर व शाहबाज अहमद हे तीन खेळाडू या मालिकेत भारतीय संघात परतले आहेत.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २० ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात जय-पराजयाचे पारडे हे भारताच्या बाजूने ११-८ असे आहे. पण, भारताला घरच्या मैदानावर ५ वेळा आफ्रिकेकडून हार मानावी लागली आहे. ९ पैकी ३ सामने भारताला जिंकता आले आहेत. तिरुअनंतपूरम येथे तीन वर्षांनी ट्वेंटी-२० सामना होतोय.. खेळपट्टीवर गवत असल्याने सुरुवातीच्या काही षटकांत जलदगती गोलंदाजाला भरपूर मदत मिळणार आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला जरा अधिक फायदा मिळेल. येथे झालेल्या १० ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ फक्त ३ वेळा जिंकला आहे, तर ७ वेळा पराभूत झाला आहे.  मागे झालेल्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने बाजी मारली होती. त्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती. हार्दिकच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे, जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे आज मुकावे लागले आणि त्याच्या जागी दीपक चहर खेळणार आहे, युजवेंद्र चहलच्या जागी आर अश्विन खेळेल.  भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, आर अश्विन, दीपक चहर. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहयुजवेंद्र चहलरिषभ पंत
Open in App