Join us

'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज

IND vs SA, 1st T20: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:02 IST

Open in App

IND vs SA, 1st T20: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले. काल झालेल्या सामन्यात हार्दिकने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आयपीएल 2022 च्या शैलीत फलंदाजी केली. हार्दिकने 250 च्या वरच्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा पार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, डावाच्या शेवटच्या षटकात त्याने दिनेश कार्तिकसोबत केलेले एक कृत्य चाहत्यांना आवडले नाही. सोशल मीडियावर हार्दिकला चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. 

हार्दिकने कार्तिकसोबत काय केले?भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. एनरिक नॉर्खिया ओव्हर टाकत होता. कार्तिकला पहिल्या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. त्याने दुसरा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळला आणि आपले खाते उघडले. आता पांड्या स्ट्राइकवर होता. त्याने नॉर्खियाच्या चौथ्या चेंडूवर लाँग षटकार ठोकला. नॉर्खियाच्या पुढच्या चेंडूवर हार्दिकने मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला, पण धाव घेण्यासाठी धावला नाही. तिथे एक धाव मिळाली असती आणि कार्तिकने त्याच्या स्टाईलने फिनिशिंग केली असती. पण, हार्दिकने तसे न करता शेवटचा चेंडू खेळला आणि दोन धावा घेतल्या. अशा प्रकारे कार्तिकला फक्त 2 चेंडू खेळता आले.

हार्दिकच्या या कृतीने नेहरा नाराज झाला हार्दिकच्या या कृतीवर त्याच्या आयपीएल संघाचा प्रशिक्षक आशिष नेहरादेखील संतापला. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “हार्दिकने शेवटच्या चेंडूवर पहिली धाव घ्यायला हवी होती. दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक होता, मी नाही." तिकडे सोशल मीडियावर चाहत्यांनीही हार्दिकला बरंच सुनावलं.

दक्षिण आफ्रिकेने सामना 5 चेंडू राखून जिंकलादक्षिण आफ्रिकेसमोर भारताने काढलेल्या 211 धावाही अपुर्‍या ठरल्या. रासी व्हॅन डर ड्युसेन आणि डेव्हिड मिलर या जोडीने हे लक्ष्य 5 चेंडू राखून पूर्ण केले. रासीने 46 चेंडूत नाबाद 75 तर मिलरने 31 चेंडूत 64 धावा केल्या. या पराभवासह भारताचे सलग 13 टी-20 सामने जिंकून विश्वविक्रम करण्याचे स्वप्नही भंगले. आता दुसरा टी-20 सामना 12 जून रोजी कटक येथे खेळवला जाणार आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्यादिनेश कार्तिकटी-20 क्रिकेटद. आफ्रिका
Open in App