Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?

Rohit Sharma Opening Partner, IND vs SA 1st ODI: शुबमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर, केएल राहुल कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:30 IST

Open in App

Rohit Sharma Opening Partner, Ruturaj Gaikwad Yashasvi Jaiswal, IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-० असा पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेनंतर आता वनडे मालिका सुरू होणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यांसाठी भारताचे दोन स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात दिसणार आहेत. भारतीय संघ वनडे मालिकेसाठी थोडा वेगळा संघ घेऊन उतरणार आहे. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे खेळणार नाही. त्यामुळे केएल राहुल कर्णधार असणार आहे. अशा परिस्थितीत, शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून दोन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.

कोण आहेत दोन पर्याय?

भारतीय संघाकडे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड असे दोन पर्याय आहेत. दोघांपैकी एकाची निवड करणे कठीण होणार आहे. केएल राहुलने आधी सलामीवीर म्हणून खेळ केला आहे. परंतु बराच काळ तो एकदिवसीय सामन्यांमध्ये ५व्या किंवा ६व्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत खेळेल. त्यामुळे यशस्वी आणि ऋतुराज यांच्यामध्ये सध्या चर्चा रंगली आहे.

यशस्वी आणि ऋतुराजचे रेकॉर्ड काय आहेत?

यशस्वी जैस्वालने आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. तो सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर येथे इंग्लंडविरुद्ध होता, ज्यामध्ये त्याने १५ धावा केल्या. काही मालिकांमध्ये तो बॅकअप ओपनर म्हणून संघात राहिला, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी चारमध्ये ओपनिंग केले आहे. ऋतुराजने एकदिवसीय सामन्यांमध्ये १९.१६ च्या सरासरीने ११५ धावा आणि एक अर्धशतक केले आहे. त्यापैकी एका सामन्यात सलामीवीर म्हणून ९८ धावा केल्या होत्या. ऋतुराजचे आकडे यशस्वीपेक्षा जास्त चांगले आहेत.

रोहितसोबत ओपनिंगला कोण?

आकड्यांचा विचार केल्यास रोहित शर्मासोबत ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण भारतीय संघ व्यवस्थापनाला उजव्या-डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी सलामीला उतरवायची असेल तर मात्र यशस्वी जैस्वालला संधी दिली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs SA ODI: Who will open with Rohit Sharma?

Web Summary : With Shubman Gill injured, Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal are contenders to open with Rohit Sharma in the ODI series against South Africa. Gaikwad has more experience, but Jaiswal offers a left-right combination.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५रोहित शर्मायशस्वी जैस्वालऋतुराज गायकवाड