Join us

IND vs SA 1st ODI Live Updates : ४०-४० षटकांचा सामना, एका गोलंदाजाला ८ षटकं! जाणून घ्या सामन्याचे करेक्ट अपडेट्स

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या या सामन्यात पावसाने जवळपास दोन तास खोडा घातला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:31 IST

Open in App

India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेनतंर वर्ल्ड कप संघातील सदस्य ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. पण, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या या सामन्यात पावसाने जवळपास दोन तास खोडा घातला. त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. दोन वेळा नाणेफेक करण्यासाठी खेळाडू मैदानावर आले, परंतु बरोबर दोन मिनिटांत पुन्हा पाऊस सुरू झाला अन् खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले. आता बीसीसीआयने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. 

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ  आजपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत मैदानावर उतरणार आहे. लखनौ इथे होणाऱ्या वन डे सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे १ वाजता होणारी नाणेफेक अर्धातास उशीराने करावी लागली, परिणामी सामनाही उशीरा सुरू झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ८७ वन डे सामने झाले आणि त्यात आफ्रिकेने ४९-३५ अशी आघाडी घेतली आहे. ३ सामने अनिर्णित राहीले. पण, घरच्या मैदानावर झालेल्या २८ पैकी १५ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. 

शिखर धवनने आफ्रिकेविरुद्ध २१ वन डे सामन्यांत ५०.८९च्या सरासरीने ९६७ धावा केल्या आहेत.  त्यात ३ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध १६ सामन्यांत ६३.३१च्या सरासहीने १०१३ धावा चोपल्या असून त्यात ६ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. 

  • BCCI ने दिलेल्या माहितीनुसार ३.३० वाजता टॉस होईल आणि ३.४५ ला सामना सुरू होईल.  
  • ४०-४० षटकांचा हा सामना असणार आहे 
  • एक गोलंदाज किमान ८ षटकं टाकू शकणार आहे
  • पहिला पॉवर प्ले - ८ षटकं
  • दुसरा पॉवर प्ले - २४ व्या षटकानंतर   
  • तिसरा पॉवर प्ले - अखेरची ८ षटकं  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App