India vs Pakistan World Championship Of Legends 2025 Semi Final : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेतील दुसऱ्या हंगामातील सेमी फायनलचे चार संघ ठरले आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात लढत नियोजित आहे. पण इंडिया चॅम्पियन्स संघातील दिग्गज खेळाडू पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध सामना खेळायला तयार नाहीत. याआधी साखळी फेरीत भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला होता. आता सेमीत पोहचल्यावर पाकिस्तानविरुद्ध सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यावर भारतीय संघातील खेळाडूंनी आधीची भूमिका कायम ठेवल्याचे समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
WCL स्पर्धेतील साखळी फेरीतील भारत-पाक सामना झाला होता रद्द
पहलगाम येथील दहशतवाही हल्ला अन् त्यानंतर भारताकडून सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांतील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत असा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. आधीपासून खंडीत असलेल्या दोन्ही देशांतील क्रिकेटमधील द्विपक्षीय मालिकेशिवाय अन्य स्पर्धेतही पाकिस्तानवर खेळू नये, हा मुद्दा गाजला अन् WCL स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीत भारतीय संघातील खेळाडूंच्या भूमिकेमुळे भारत-पाक सामना रद्दही झाला.
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
सेमी फायनलमध्येही तीच भूमिका; भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध खेळण्यास दिला नकार
पीटीआयने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, इंडिया चॅम्पियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारताच्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध सेमी फायनलसाठी मैदानात उतरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात बर्मिंगहॅमच्या मैदानात होणारी लढत होणार नाही.
पाकिस्तान थेट फायनल खेळणार?
साखळी फेरीत सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता. आता सेमी फायनल लढत रद्द झाली तर त्याचा फायदा थेट पाकिस्तानला होईल. भारतीय संघाने माघार घेतल्यानंतर त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळेल. दुसऱ्या सेमी फायलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी पाक जेतेपदासाठी भिडू शकतो. पण यासंदर्भात अद्याप WCL स्पर्धेच्या आयोजकांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Web Title: IND vs PAK WCL 2025 Semi Final Indian Former Cricketers Who Representing India Champions Have Refused To Play Against Pakistan Champions World Championship Of Legends 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.