IND vs PAK U19 Asia Cup Final Who Is Sameer Minhas Breaks Vaibhav Sooryavanshi Record : दुबई येथील आयसीसी अकादमीच्या मैदानात रंगलेल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या समीर मिन्हास याने विक्रमी खेळी साकारली. भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानच्या संघाने ३१ धावांवर पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर सलामीवीर समीर मिन्हास याने धमाकेदार खेळी करत फायनलची लढाई ३०० पार धावसंख्येची केली. पाक बॅटरनं यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंतिम सामन्यातील ११३ चेंडूतील १७२ धावांच्या खेळीसह समीर मिन्हास याने अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला आहे. गत हंगामातील आपल्याच सहकाऱ्याने केलेल्या विक्रम मागे टाकत तो अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- समीर मिन्हास (पाकिस्तान U19)- १७२ धावा, ICCA दुबई (२०२५
- शहजैब खान (पाकिस्तान U19) - १५९ धावा, दुबई DICS (२०२४)
- जे. व्ही. परांजपे (भारत U19) -१३९* ईडन गार्डन्स (१९९०)
- सामी अस्लम (पाकिस्तान U19) - १३४ धावा, क्वालालंपूर (२०१२)
U19 आशिया कप स्पर्धेत समीर मिन्हासनं दोनदा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीत UAE विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने ९५ चेंडूत १७१ धावांची लक्षवेधी खेळी केली होती. दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी पाकिस्तानकडून समीर मिन्हास याने १४८ चेंडूत १७७ धावा करत वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक केले. आता फायनलमध्ये १७२ धावांच्या खेळीसह दुसऱ्यांदा त्याने यंदाच्या एका हंगामात दुसऱ्यांदा वैभव सूर्यवंशीचा सर्वोच्च धावसंख्येचा वैयक्तिक विक्रम मोडला आहे. पण यंदाच्या हंगामात सर्वोच्च धावांचा विक्रम हा भारतीयाच्या नावे आहे. अभित्रान कुंडू याने मलेशियाविरुद्ध २०९ धावांची खेळी केली होती.
यंदाच्या हंगामात सर्वोच्च धावसंख्ये करणारे फलंदाज
- अभिज्ञान कुंडू- १२५ चेंडूत २०९ धावा, विरुद्ध मलेशिया
- समीर मिन्हास - १४८ चेंडूत १७७ धावा, विरुद्ध मलेशिया
- समीर मिन्हानस- ११३ चेंडूत १७२ धावा, विरुद्ध भारत
- वैभव सूर्यवंशी - ९५ चेंडूत १७१ धावा, विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
कोण आहे Sameer Minhas?
१९ वर्षीय समीर मिन्हास हा उजव्या हाताने फलंदाजी करणारा क्रिकेटर आहे. तो उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजीही करु शकतो. पाकिस्तानकडून आतापर्यंत चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अराफात मिन्हास याचा तो धाकटा भाऊ आहे. समीर मिन्हासने आतापर्यंतच्या छोड्या कारकिर्दीत दमदार कामगिरीसह आपल्यातील धमक दाखवून दिली आहे.