Join us

IND vs PAK T20 WC: शमी आणि अफ्रीदीमध्ये काय चर्चा झाली? PCB ने शेअर केला VIDEO...

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची नेट्सवर भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 17:32 IST

Open in App

IND vs PAK T20 WC:पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी T-20 वर्ल्डकपसाठी तयार झाला आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीही दीर्घ कालावधीनंतर T-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे आफ्रिदी पाकिस्तानी संघाबाहेर होता, तर शमीही अनेक महिन्यांपासून या फॉरमॅटमध्ये खेळला नाही. दरम्यान, वर्ल्डकप सामन्यापूर्वी आफ्रिदी आणि शमी सोबत सराव करताना दिसले.

जसप्रीत बुमराहच्या जागी शमीची T-20 विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड झाली आहे. यापूर्वी त्याचा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समावेश होता. गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आणि त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना झाला. पाकिस्तानच्या सराव सामन्यापूर्वी शमी आणि आफ्रिदी नेट्सवर भेटले. शाहीन आल्यावर शमीने त्याला बोलावले आणि दोघांनी गळाभेट केली. 

पाहा व्हिडिओ:-

यावेळी शमी म्हणाला, 'शाहीन भाई कसा आहे?' शाहीननेही शमीच्या तब्येतही विचारपूस केली. त्यांच्या भेटीचा आणि संभाषणाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत, आफ्रिदी शमीकडून काही टिप्स घेतानाही दिसत आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App