IND vs PAK : अभिषेक शर्मा खेळणार? “जर पाकिस्तानला वाटत असेल तर…” सूर्यानं दिलं हटके उत्तर

नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:04 IST2026-02-14T18:00:26+5:302026-02-14T18:04:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK Suryakumar Yadav Has Confirmed That Abhishek Sharma Will Play Against Pakistan Tomorrow ICC T20 World Cup 2026 Match | IND vs PAK : अभिषेक शर्मा खेळणार? “जर पाकिस्तानला वाटत असेल तर…” सूर्यानं दिलं हटके उत्तर

IND vs PAK : अभिषेक शर्मा खेळणार? “जर पाकिस्तानला वाटत असेल तर…” सूर्यानं दिलं हटके उत्तर

IND vs PAK Suryakumar Yadav Has Confirmed That Abhishek Sharma Will Play Against Pakistan : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्याआधी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पुढच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज आहे. रविवारी १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान  कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. या सामन्यासाठी अभिषेक शर्मा तंदुरुस्त असल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं अगदी हटके अंदाजात दिल्याचे पाहायला मिळाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तब्येत बिघडल्यामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला होता अभिषेक शर्मा

भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा हा  पोटातील संसर्गजन्य विकारामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. त्याच्या जागी संजू सॅमसनला संंधी मिळाली होती. पण आता पाकिस्तान विरुद्धच्या मेगा लढतीसाठी भारतीय संघाती तोफ पुन्हा एकदा धडाडण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. पाकिस्तानविरुद्ध तो ही कसर भरून काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.  

IND vs PAK : सलमान अली आगाचं मोठं वक्तव्य; ‘हँडशेक’ आणि अभिषेक शर्माबाबत म्हणाला, “आम्हाला..."

अभिषेक शर्मा खेळणार का?  सूर्यकुमार यादवनं असा दिला रिप्लाय

पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्याआधी  झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने पाकिस्तान कर्णधाराच्या वक्तव्याचा दाखला देत अभिषेक शर्मा नक्कीच मैदानात उतरेल, असे सांगितले.  सूर्यकुमार यादव म्हणाला की, "जर पाकिस्तानला आम्ही अभिषेकला खेळवावं असं वाटत असेल, तर ठीक आहे. तो उद्या खेळेल." त्यांची ही प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा ( Salman Ali Agha) यांच्या वक्तव्यानंतर आली आहे.

काय म्हणाला होता पाकिस्तानचा कर्णधार?

सूर्यकुमार यादवआधी पाकिस्तानी कर्णधाराने पत्रकार परिषदेत अभिषेकबाबत वक्तव्य केले होते.  अभिषेक शर्मा एक चांगला खेळाडू आहे, हे आपल्याला माहीत आहे. मला खरोखर आशा आहे की, तो उद्या खेळेल, कारण आम्हाला त्यांच्या सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळायचे आहे. पाकिस्तानी कर्णधाराच्या या वक्तव्यामुळेच अभिषेक शर्माच्या फिटनेससंदर्भात माहिती देताना सूर्यकुमारनं हटके उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title : IND vs PAK: क्या अभिषेक शर्मा खेलेंगे? सूर्य का हाजिरजवाबी जवाब।

Web Summary : अभिषेक शर्मा पाकिस्तान के खिलाफ खेलने के लिए फिट हैं। सूर्यकुमार यादव ने उनकी भागीदारी की पुष्टि की, और मजाकिया ढंग से पाकिस्तान की शर्मा को शामिल करने की उम्मीद का जिक्र किया। यादव ने कहा कि अगर पाकिस्तान चाहेगा तो शर्मा खेलेंगे।

Web Title : IND vs PAK: Abhishek Sharma to play? Surya's witty reply.

Web Summary : Abhishek Sharma is fit to play against Pakistan. Suryakumar Yadav confirmed his participation, humorously referencing Pakistan's hope for Sharma's inclusion. Yadav stated Sharma will play if Pakistan wants him to.