Join us

Ind Vs Pak: नये शहजादे के लिए छोटा सा तोहफा, नया बुमराह बने!

Ind Vs Pak, Asia Cup: क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतात तेव्हा   जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. शाब्दिक युद्धही अनुभवता येते. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना मित्रांसारखी वागणूक देत आहेत.  पीसीबीने रविवारी व्हिडीओ शेअर केला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 06:19 IST

Open in App

कोलंबो-क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतात तेव्हा   जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. शाब्दिक युद्धही अनुभवता येते. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना मित्रांसारखी वागणूक देत आहेत.  पीसीबीने रविवारी व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. कोलंबो स्टेडियमवर  शाहीन आफ्रिदीने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला खास भेट दिली. बुमराह नुकताच पिता बनला.     शाहीनने बुमराहला पिता बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला,   ‘भाई जी, बहुत-बहुत मुबारक हो। नये शहजादे के लिए  छोटा सा तोहफा है। अल्लाह उसे हमेशा खुश रखे और वह नया बुमराह बने।’ गिफ्ट आणि शुभेच्छांबद्दल बुमराहने शाहीनचे आभार मानले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023जसप्रित बुमराह