Join us

टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?

Shubman Gill Injury, IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कपसाठी शुबमन गिलला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:21 IST

Open in App

Shubman Gill Injury, IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आलेल्या गिलला सराव करताना दुखापत झाली. गिलच्या हाताला दुखापत झाली, त्यानंतर तो वेदनेत दिसला. युएईविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गिल चांगल्या स्थितीत दिसत होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.

गिलच्या दुखापतीमुळे संघ चिंतेत

शुभमन गिलला दुखापत झाल्यानंतर नेट्समध्ये गोंधळ उडाला. टीम फिजिओ त्याच्याकडे धावले आणि त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले. दुखापत झाल्यानंतर गिल नेट्स सोडून गेला. तो दुखापतग्रस्त दिसला आणि बर्फाने दुखापतीवर शेक देताना दिसला. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्या दुखापतीबद्दल चौकशी करताना दिसले. अभिषेक शर्मानेही गिलला पाणी प्यायला दिले.

ताजी अपडेट काय?

गिलची दुखापत फारशी गंभीर नव्हती. काही मिनिटांनी तो पुन्हा सराव करण्यासाठी नेटवर परतला. सरावादरम्यान, संघाचे फिजिओ त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी सतत त्याचे निरीक्षण केले. एकंदरीत, टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून घाबरण्याचे काहीही कारण नाही असे म्हणता येईल.

टॅग्स :आशिया कप २०२५शुभमन गिलभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ