Join us

IND vs PAK: भारताचा 'हिटमॅन' पाकिस्तानला रडवणार! दुबईत रोहित शर्माचा 'सुपरहिट' रेकॉर्ड

Rohit Sharma Record in Dubai, IND vs PAK Champions Trophy 2025: टीम इंडियाचा उद्या (२३ फेब्रुवारीला) पाकिस्तानशी दुबईच्या स्टेडियमवर होणार महामुकाबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:42 IST

Open in App

Rohit Sharma Record in Dubai, IND vs PAK Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना खूप दबावाचा असतो. पण टीम इंडियाला काळजी करण्याची गरज नाही. संघातील सर्व फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये आहेत. शुभमन गिलने गेल्या दोन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. श्रेयस अय्यर सातत्याने स्फोटक फलंदाजी करत आहे. विराट कोहली नेहमीच पाकिस्तानविरुद्ध धावा काढण्यासाठी ओळखला जातो. पण रोहित शर्माचादुबईच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल की तो एकटाच पाकिस्तानी संघासाठी पुरेसा आहे.

रोहित पाकिस्तानवर पडलाय भारी, दुबईमध्ये दोनदा पराभव

भारतीय कर्णधार रोहित शर्माने दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या आहेत आणि दोनदा त्यांना वाईटरित्या पराभूतही केले आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना २०१८च्या आशिया कपमध्ये खेळला गेला होता. या स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले. त्यात भारताने १९ सप्टेंबरला पाकिस्तानला हरवले. या सामन्यात रोहितने अवघ्या १६३ धावांचा पाठलाग करताना ५२ धावांची खेळी केली होती. तर दुसरी लढत २३ सप्टेंबरला झाली होती, ज्यामध्ये रोहितने २३८ धावांचा पाठलाग करताना १११ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ४०व्या षटकात फक्त १ विकेट गमावून जिंकला होता.

पाकिस्तानविरूद्ध रोहितची दमदार कामगिरी

रोहित अनेकदा दुबईच्या खेळपट्टीवर पाकिस्तानसाठी कर्दनकाळ बनला आहे. त्याने एकहाती सामने संपवले आहेत. केवळ दुबईतच नव्हे जगात कुठेही रोहित पाकिस्तानवर भारी पडला आहे. रोहित शर्माचा पाकिस्तान विरुद्धचा वनडे सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने शेजारच्या देशाविरुद्ध १९ डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये ५१.३५ च्या सरासरीने ८७३ धावा केल्या आहेत. या काळात रोहितने २ शतके आणि ८ अर्धशतकेही ठोकली आहेत. पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध वनडेमध्ये त्याने १९ डावांमध्ये ७८ चौकार आणि २६ षटकार मारले आहेत. तसेच, रोहितने आतापर्यंत आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक ३५० धावा केल्या आहेत.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघदुबई