भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

14 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकपचा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 08:21 PM2023-10-13T20:21:44+5:302023-10-13T20:22:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK, ODI World Cup: unique way for India-Pak match; Fan Book a hospital room to stay | भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs PAK, ODI World Cup: उद्या, म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही संघ एकमेकांना भीडतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल.

या हायव्होल्टेज सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा सामना पाहण्यासाठी गुजरातसह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक अहमदाबादेत पोहोचणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी परदेशी प्रेक्षकही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येणार आहेत. या ब्लॉकबस्टर सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही प्रेक्षकांनी तर आरोग्य तपासणीच्या बहाण्याने अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे.

अनेक सेलिब्रिटींची हजेरी
अहमदाबादमध्ये होणारा हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीही मैदानावर पोहोचणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, आधार पूनावाला यांचा समावेश आहे. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमचे दरवाजे सकाळी 10 वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी उघडले जाणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मैदानात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 12.30 वाजता मैदानात 1.30 लाख प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन परफॉर्म करणार आहेत.

7 हजार पोलीस तैनात 
प्रेक्षकांच्या सोयीसाठी मैदानाजवळ 15 पार्किंग प्लॉट करण्यात आले आहेत. सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये धावणाऱ्या मेट्रो आणि बीआरटीएस सुविधांची फ्रीक्वेंसी वाढवण्यात आली आहे. या सर्व सुविधा रात्री दीड वाजेपर्यंत उपलब्ध असतील. अहमदाबाद पोलिसांनीही हाय व्होल्टेज सामन्यासाठी विशेष तयारी केली आहे. मैदानाच्या आत आणि बाहेर सुमारे 7,000 सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. एनएसजी आणि आरएएफसह केंद्रीय पोलीस दलही मैदानात तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातूनही विशेष पाळत ठेवली जाणार आहे.

Web Title: IND vs PAK, ODI World Cup: unique way for India-Pak match; Fan Book a hospital room to stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.