IND vs PAK : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; 'लांबलचक' ओव्हर टाकून शमीनं मैदान सोडलं

मोहम्मद शमीमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन, लांब पल्ल्याच षटक टाकून दुखापतीन त्रस्त दिसला स्टार बॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:13 IST2025-02-23T15:11:05+5:302025-02-23T15:13:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK Mohammed Shami’s bowls longest Champions Trophy over by an Indian walks off field with injury concern | IND vs PAK : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; 'लांबलचक' ओव्हर टाकून शमीनं मैदान सोडलं

IND vs PAK : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; 'लांबलचक' ओव्हर टाकून शमीनं मैदान सोडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या भारत- पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील लढतीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा कॅप्टन  मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्टार गोलंदाज मोहम्मद शमीनं गोलंदाजीची सुरुवात केली. पण त्याला लौकिकाला साजेशी सुरुवात करता आली नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

११ चेंडूचं पहिल षटक, शमीच्या नावे झाला नकोसा विक्रम 

मोहम्मद शमीनं पहिल्या षटकात इमाम उल हक आणि बाबर आझमला तब्बल ११ चेंडू टाकले. या षटकात मोहम्मद शमीनं फक्त ६ धावाच खर्च केल्या, पण पाच वाईडच्या रुपात अंवातर टाकलेल्या चेंडूमुळे त्याचे षटक लांबलचक ठरले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक चेंडूच षटक टाकण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावे झाला. एवढेच नाही तर त्यानंत दुखापतीमुळे त्रस्त शमीनं मैदानही सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यामुळे हायहोल्टेज सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाच टेन्शन वाढलं आहे. 

Web Title: IND vs PAK Mohammed Shami’s bowls longest Champions Trophy over by an Indian walks off field with injury concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.