Join us

IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव

पाकिस्तान विरुद्ध कुलदीप यादव याचा रेकॉर्ड एकदम जबरदस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 22:51 IST

Open in App

IND vs PAK Kuldeep Yadav Missed Hattrick But Set Record : आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवनं आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. संधी मिळाली की, सोनं कसं करायचं ते मला माहितीये, अशी कामगिरी त्याने पुन्हा एकदा करून दाखवली. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत कुलदीप यादव हॅटट्रिकवरही पोचला होता. त्याची हॅटट्रिक हुकली. पण या सामन्यात ३ विकेट्स घेत त्याने पाकिस्तानची फिरकी घेतलीचच. याशिवाय आशिया कप स्पर्धेत मोठा डावही साधला आहे.

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हॅटट्रिकची संधी हुकली, पण...

पाकिस्तान विरुद्ध कुलदीप यादवचा रेकॉर्ड एकदम जबरदस्त आहे. हा रेकॉर्ड त्याने आणखी उत्तम केलाय. पाकिस्तानच्या डावातील  १३ व्या षटकातील  चौथ्या चेंडूवर त्याने हसन नवाझला आपल्या जाळ्यात अडकवले. पाचव्या चेंडूवर मोहम्मद नवाझ त्याच्या जाळ्यात फसला. फहिम अशरफनं याने षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढला अन्  कुलदीपची हॅटट्रिकची संधी हुकली. पण ४ कोट्याच्या षटकात फक्त १८ धावा खर्च करून ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत कुलदीप यादवनं मोठा डाव साधला आहे. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या साहिबजादा फरहान (४० धावा) याची विकेटही कुलदीपनेच घेतली. 

IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अश्विनला ओव्हरटेक करत भारताचा नंबर वन फिरकीपटू ठरला कुलदीप

टी-२० आशिया चषक स्पर्धेतील यूएई विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात कुलदीप यादवनं ४ विकेट्सचा डाव साधला होता. पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३ विकेट्स घेत त्याने आता पहिल्या दोन सामन्यात ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. या कामगिरीसह तो टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. त्याआधी आर. अश्विन या यादीत अव्वलस्थानी होता. त्याने आशिया चषक स्पर्धेत ६ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपनं दोन सामन्यातच अश्विनला मागे टाकले आहे.

पाकिस्तान विरुद्ध कमालीचा रेकॉर्ड 

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कुलदीप यादवनं पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यात त्याने १८ विकेट्स घेतल्याआहेत. २५धावा खर्च करत ५ विकेट्स ही पाकिस्तान विरुद्धची त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. आतापर्यंतच्या ४२ टी-२० सामन्यात कुलदीप यादवनं ७६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानकुलदीप यादव