Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK: "२०११ चा विश्वचषक धोनीने नाही तर भारताने जिंकला होता पण...", गौतम गंभीरने व्यक्त केली नाराजी

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 12:24 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध (IND vs PAK) रविवारी होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा रनसंग्राम होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. मात्र या बहुचर्चित सामन्यापूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू अनेक मुद्द्यांवर भाष्य करून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही गोष्टींबाबत खात्री बाळगण्याचा सल्ला देखील दिला आहे. तो म्हणाला, सोशल मीडियावर जे काही चालले आहे आणि मीडियामध्ये काय चालले आहे, त्या सर्व गोष्टी खर्‍या नसतात आणि सर्व गोष्टी खोट्याही नसतात, त्यामुळे याबाबत खात्री बाळगली पाहिजे. 

२००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार खेळी खेळणारा गौतम गंभीर म्हणाला, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत जात असाल आणि तिथे तुमचा सामना पाकिस्तानशी होत आहे. तसेच इतर संघाचा देखील सामना करावा लागणार आहे. अशा संघांना तोंड देताना सोशल मीडियावर जे चालले आहे त्यापासून दूर राहणे चांगले आहे कारण माझ्या काळात गोष्टी थोड्या सोप्या होत्या कारण तेव्हा फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया होता. असे गौतम गंभीरने झी हिंदी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले. 

खेळाडूंनी मीडीयाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजेतेव्हा आम्ही मीडियाकडे खूप लक्ष द्यायचो. जेव्हा आम्ही रूममध्ये जायचो तेव्हा आमच्याकडे पाहण्यासाठी वेगवेगळे चॅनेल होते, परंतु आता तुम्ही फोनवर सोशल मीडिया पाहता, तुम्ही सोशल मीडियावर गोष्टी पोस्ट करता आणि जे काही बोलले ते सोशल मीडियावर व्हायरल होत राहते. त्यापेक्षा त्यापासून दूर राहणे केव्हाही चांगले होईल. अशा मोठ्या स्पर्धेतील एका सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर स्तुती करणे आणि केवळ एका सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर टीका करणे योग्य नाही.

विजयाचे श्रेय फक्त कर्णधारालाच दिले जाते रोहित शर्मा हा त्याच्यासोबत असणाऱ्या १० खेळाडूंसारखाच चांगला खेळाडू आहे. रोहित शर्मा फक्त प्लॅन बनवू शकतो, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गोलंदाजांची आहे. दुर्दैवाने भारतात असे घडते की भारताने वर्ल्ड कप जिंकला तर त्याचे सर्व श्रेय फक्त रोहित शर्माला दिले जाईल. त्यामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला तर तो रोहितने जिंकला नसेल, भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला असेल. आम्ही २००७ मध्ये विश्वचषक जिंकला होता, तेव्हा सर्वजण तो धोनीने जिंकला असे म्हणत होते. तसेच २०११ मध्ये विश्वचषक जिंकला त्याचेही श्रेय फक्त धोनीला दिले जाते. १०९३ मध्ये कप जिंकला तो कपिल देव यांनी जिंकला असे बोलले जाते. मात्र त्यावेळी देखील भारताने कप जिंकला कारण कुणी झेल घेतला होता, कुणी धावा केल्या होत्या तर कुणी चेंडू टाकला होता. असे गौतम गंभीरने अधिक म्हटले. एकूणच विजयाचे श्रेय हे केवळ संघाच्या कर्णधाराला दिले जाते असे गंभीरने म्हटले आहे. 

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक२३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न२७ ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, १२.३० वाजल्यापासून, सिडनी३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून, पर्थ२ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, १.३० वाजल्यापासून, अॅडलेड६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, १.३० वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मामहेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर
Open in App