Asia Cup 2025 India vs Pakistan Final : आशिया चषक स्पर्धेतील फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकच्या फलंदाजांनी जोर दाखवला. पण त्यांचा हा तोरा फार काळ काही टिकला नाही. भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक करत पाकिस्तानची हवा काढली. साहिबजादा आणि फखर झमान या सलामी जोडीनं पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानचा संघ कोलमडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१२ व्या षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात ११३ धावा; १९ व्या षटकात पाक संघ १४६ धावांवर ऑल आउट
पाकिस्तानच्या संघाने १२ व्या षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. वरुण चक्रवर्ती याने सलामी जोडी फोडल्यावर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव जोडीनं आपल्या फिरकीतील जादू दाखवली. कुलदीपनं आपल्या कोट्यातील शेवटच्या षटकात ओव्हर हॅटट्रिकचा डाव साधत पाकिस्तानच्या फलंदाजीतील हवाच काढली. परिणामी जोमात सुरुवात करणारा पाकिस्तान संघ कोमात गेला. पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर ऑल आउट झाला. पाक संघाने ८ षटकात ८ विकेट्स गमावल्या. यात कुलदीप यादवनं एकाच षटकात तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनं आपल्या कोट्यातील अखेरच्या दोन षटकात बॅक टू बॅक दोन विकेट्स घेतल्या.
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
१० व्या षटकात पहिली विकेट, मग पाठोपाठ फिरकीच्या जाळ्यात अडकत गेले पाकचे फलंदाज
पाकिस्तानच्या संघाने दमदार सुरुवात केल्यावर भारतीय संघ थोडा बॅकफूटवर गेला होता. पण वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या मदतीला धावला. दहाव्या षटकात त्याने अर्धशतकवीर साहिबजादा फरहान याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले . तो ३८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा करून तंबूत परतला. कुलदीप यादवनं सईम अयूबच्या रुपात या सामन्यात आपली पहिली विकेट घेतली अन् इथून विकेटचा सिलसिला सुरु झाला. मोहम्मद हारिस हा अक्षर पटेलच्या जाळ्यात फसला. फखर झमानच्या रुपात दुसऱ्या सलामीवीराची विकेटही वरुण चक्रवर्तीनंच घेतली अन् पाकचा संघाच्या अडचणी आणखी वाढवल्या. अक्षर पटेलनं हुसेन तलतच्या रुपात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली अन् पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला.
अखेरच्या षटकात कुलदीप यादवची कमालपाकिस्तानच्या डावातील १७ व्या षटकात कुलदीप यादव आपलं अखेरचं षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर त्याने पाकचा कर्णधार सलमान आगाला तंबूचा रस्ता दाखवला. याच षटकात त्याने शाहीन शाह आफ्रिदी आणि फहीम अशरफ यांची विकेट घेतली. ओव्हर हॅटट्रिकसह त्याने ४ षटकात ३० धावा खर्च करत ४ विकेट्सचा डाव साधला. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा रेकॉर्डही भक्कम केला.
Web Summary : Pakistan's strong start faltered as Indian bowlers dominated. Kuldeep Yadav's hat-trick over dismantled Pakistan's batting lineup after a promising opening partnership. Varun Chakravarthy and Axar Patel also contributed to India's comeback.
Web Summary : पाकिस्तान की मजबूत शुरुआत भारतीय गेंदबाजों के आगे फीकी पड़ी। कुलदीप यादव की हैट्रिक ने पाकिस्तान की बल्लेबाजी को तहस-नहस कर दिया। वरुण चक्रवर्ती और अक्षर पटेल ने भी भारत की वापसी में योगदान दिया।