Join us

IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

टीम इंडिया आपल्या भूमिकेवर ठाम; पाकचे मंत्री अन् आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षांकडून ट्रॉफी घेण्यास दिला साफ नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 01:59 IST

Open in App

IND vs PAK Asia Cup Final Team India Refused To Collect Their Awards And Trophy From ACC Chief And Pak Interior Minister  : दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या संघाला चारीमुंड्याचित करत आशियातील किंग असल्याचे दाखवून दिले. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात ४१ वर्षांनी पहिल्यांदा रंगलेल्या सामन्यात भारतीय संघच बाजी मारणार हे जवळपास फिक्स होते. या सामन्यात थोडी रिस्कही वाटत होती. पण तिलक वर्माच्या भात्यातून क्लास खेळी आणि आणि टीम इंडियाने आपला रुबाब कायम राखला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सामना झाल्यावर प्रेझेंटेशनला तासभर उशीर झाला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ट्रॉफी कुणाकडून स्वीकारणार हा मोठा प्रश्न होता. भारतीय संघातील खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आणि मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी आणि मेडल घेण्यास नकार दिला. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय संघानं आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नाही हे आधीच कळवलं होतं. ठरल्याप्रमाणे भारतीय संघाने आपल्या निर्णयावर ठाम राहत विजयी जल्लोष केल्यावर स्पर्धेचा शेवट बहिष्कारानं केल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Wins Asia Cup, Refuses Award from Pakistani Officials

Web Summary : India defeated Pakistan in the Asia Cup final in Dubai. However, the Indian team refused to accept the trophy and medals from the Asian Cricket Council chief and Pakistani minister Mohsin Naqvi, creating controversy after the victory.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तान