IND vs PAK Asia Cup Final Team India Refused To Collect Their Awards And Trophy From ACC Chief And Pak Interior Minister : दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या संघाला चारीमुंड्याचित करत आशियातील किंग असल्याचे दाखवून दिले. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात ४१ वर्षांनी पहिल्यांदा रंगलेल्या सामन्यात भारतीय संघच बाजी मारणार हे जवळपास फिक्स होते. या सामन्यात थोडी रिस्कही वाटत होती. पण तिलक वर्माच्या भात्यातून क्लास खेळी आणि आणि टीम इंडियाने आपला रुबाब कायम राखला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिमाखदार विजयानंतर टीम इंडियानं बहिष्कारासह केला शेवट
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय संघानं आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. फायनल आधी घेतलेल्या आपल्या या निर्णयावर टीम इंडिया शेवटपर्यंत ठाम राहिली. BCCI नं आशिया कप ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेला कळवलही होतं. वैयक्तिक बक्षीस दिल्यावर सूत्रसंचालक सायमन डूल यांनी क्लोजिंग सेरेमनीची सांगता झाल्याची घोषणा केली. भारताकडून अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी वैयक्तिक पुरस्कार स्वीकारले. पण भारतीय संघाने एकत्र जाऊन ट्रॉफी स्वीकारली नाही किंवा स्टेजवर फोटोसेशनही केलं नाही.
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK, Asia Cup Final 2025 Match Highlights
पाक खेळाडूंसमोर भारतीय क्रिकेट चाहत्यांची घोषणा बाजी
भारतीय खेळाडू यावेळी एका बाजूला बसलेले दिसले. इथंच खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच विजयी जल्लोष केला. याआधी मॅच संपल्यावर पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंगरूममधून बाहेर आले नव्हते. फक्त त्यांचे अध्यक्ष मोहसिन नक्वी स्टेजवर उपस्थित होते. ACC च्या प्रोटोकॉलनुसार ट्रॉफी देण्यास ते तयार होते. जवळपास ५५ मिनिटांनंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा आणि त्याचे सहकारी खेळाडू ड्रेसिंग रुममधून बाहेर आले. यावळी भारतीय प्रेक्षकांनी 'इंडिया… इंडिया…" अशा अशा घोषणा दिल्याचेही पाहायला मिळाले.