Join us

IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया

पाकिस्तान विरुद्ध बहिष्कार टाकण्याची लाट उसळली, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:18 IST

Open in App

IND vs PAK Asia Cup 2025 Schedule Fans Troll BCCI : आशियाई क्रिकेट परिषदेनं शनिवारी आशिया कप २०२५ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याचीही आता स्पष्ट झाले आहे. एका बाजूला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ या स्पर्धेत भारताच्या दिग्गज खेळाडूंनी पाक संघाविरुद्ध खेळण्यास नकार दिला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी दाखवल्यामुळे काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करण्यात येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकिस्तान विरुद्ध बहिष्कार टाकण्याची लाट उसळली, पण आता....

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थितीनंतर पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, अशी लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतून माघार घेणार असल्याची गोष्टही चर्चेचा विषय ठरली. ढाका येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीवरही BCCI बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले गेले. पण शेवटी बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला व्हर्चुअली या बैठकीत सामील झाले अन् आता भारतीय संघ आशिया कपसाठी तयार असल्याचेच नाही तर पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

स्पर्धेचे वेळापत्रक आले अन् भारत-पाक यांच्यातील सामना कधी तेही ठरलं!

आगामी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद हे बीसीसीआयकडे आहे. या स्पर्धेच्या आयोजनासह पाकिस्तानसोबत खेळण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हा भारत सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते. आता आशियाई क्रिकेट परिषदेचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आगामी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एवढेच नाही १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामनाही फिक्स आहे.

 कारगिल विजय दिवस अन्  भारत-पाक सामन्याचा मुहूर्त, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक समोर आल्यावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. एका वापरकरत्यांनी बीसीसीआयने आगामी आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक हे कारगिल विजय दिवस साजरा होत असताना जाहिर केल्याची खंत व्यक्त केली आहे. पाकिस्तानसोबत सामना खेळणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना निधी देणं असा आहे. ते या निधीचा वापर पुन्हा आपल्याविरुद्ध नापाक कारवायांसाठी करतील, असे म्हणत पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी भावना व्यक्त केली आहे.

भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का?

आयपीएल स्पर्धेवेळी बीसीसीआयने भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, अशी नौटंकी करत भारतीयांना मूर्ख बनवले, असा दावा एका नेटकऱ्याने केला आहे. जर तुम्ही खरंच भारतीय सेनेचा अभिमान बाळगत असाल तर एकतर पाकिस्तान विरुद्ध खेळू नका. नाहीतर स्पर्धेतून माघार घ्या, अशा शब्दांत बीसीसीआयला सुनावल्याचे दिसते.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय