IND vs NZ, Arshdeep Singh Breaks Shaheen Afridi Record भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात छोट्या प्रारुपातील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंग याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर टी-२० क्रिकेटमधील २३८ धावांसह सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. या विक्रमी धावसंख्येचा बचाव करताना अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकात विकेटचा डाव साधत विश्वविक्रमाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्शदीपचा मोठा पराक्रम, शाहीन शाह आफ्रिदाला धोबीपछाड देत बनला नंबर वन
भारतीय टी-२० संघातून अल्पावधित खास छाप सोडणारा अर्शदीप सिंग हा पहिल्या षटकात विकेट्स घेण्यात माहिर आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने डेवॉन कॉन्वेला खातेही न उघडू देता तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह अर्शदीप सिंग हा पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीच्या नावे होता. त्याला अर्शदीप सिंगनं धोबीपछाड दिली आहे.
तळापर्यंत फलंदाजी, सात गोलंदाजी पर्याय; टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह संकेत!
गोलंदाजीची सुरुवात करताना सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला अर्शदीप
अर्शदीप सिंगने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेमध्ये पहिल्या दोन षटकांपैकी एका षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या खात्यात आता २८ विकेट्स जमा आहेत. या यादीत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी २७ विकेट्स सह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय युएईच्या जुनैद सिद्दकीनं २७ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
अर्शदीप सिंग (भारत) – २८ विकेट्स
शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) – २७ विकेट्स
जुनैद सिद्दकी (यूएई) – २७ विकेट्स
पवनदीप सिंग (मलेशिया) – २६ विकेट्स
बिलाल खान (ओमान) – २५ विकेट्स
टिम साउदी (न्यूझीलंड) – २५ विकेट्ल
अर्शदीप सिंगचा टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड
अर्शदीप सिंग याने आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ७३ सामन्यात १११ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ९ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित ४ सामन्यासह आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो टीम इंडियासाठी सर्वोत्तम योगदान देत अनेक विक्रम आपल्या नावे करु शकतो.