IND vs NZ T20 World Cup 2026 Final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील जेतेपदासाठीची लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात दोन्ही संघ मैदानात उतरताच एक नवा इतिहास रचला जाईल. आयसीसीच्या वेगवेगळ्या तीन प्रकारात फायनल खेळण्याचा अनोखा विक्रम भारत-न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळेल. याआधी २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये, त्यानंतर गतवर्षी २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ समोरासमोर आले होते. इथं एक नजर टाकुयात ऐतिहासिक 'ग्रँड फिनाले'चा आनंद कुठे अन् कसा घेता येईल? यासह टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघाचा रेकॉर्ड कसा आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरणार मैदानात
भारतीय संघ अहमदाबादच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावत इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. जर हा डाव साध्य झाला तर यजमान संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचा खास विक्रमही टीम इंडियाच्या नावे होईल. एवढेच नाही तर तिसऱ्या जेतेपदासह सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा डाव साधण्याचीही सूर्या ब्रिगेडला संधी आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या प्रयत्नात पहिली वहिली टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवण्यासाठी जोर लावताना दिसेल.
"सगळे एकच ओळ..." सूर्या दादानं न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला दिला कडक रिप्लाय; तो नेमकं काय म्हणाला?
IND vs NZ यांच्यात ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये कोण भारी?
भारत-न्यूझीलंड हे दोन संघ आतापर्यंतच्या इतिहासात ४ वेळा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये एकमेकांना भिडले आहेत. २००० मध्ये पहिल्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC नॉकआउट) फायनलमध्ये दोन्ही संघात पहिली फायनल झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. २०२१ मध्ये WTC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धत न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर २०२५ मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले. आता टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडिया ICC स्पर्धेत न्यूझीलंडची बरोबरी करण्याची संधी असेल.
टी-२० मध्ये कसा आहे भारत-न्यूझीलंड यांच्यातील रेकॉर्ड?
एकंदरीत टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची न्यूझीलंडवर १८-११ अशी तगडी आघाडी आहे. पण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचे पारडे जड आहे. २००७ च्या पहिल्या हंगामात भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडच्या संघासमोर भारतीय संघ कमी पडला होता. २०१६ च्या हंगामात नागपूरच्या हंगामातही तेच घडले अन् २०२१ च्या स्पर्धेत दुबईच्या मैदानात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली होती.
IND vs NZ यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप फायनल सामना लाईव्ह कुठे पाहायचा?
- टीव्ही प्रसारण: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
- लाईव्ह स्ट्रिमिंग: मोबाईलच्या माध्यमातून जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवरही या सामना लाईव्ह पाहता येईल.
सामना कधी आणि कुठे रंगणार?
- सामन्याची तारीख : ८ मार्च, २०२६
- सामन्याची वेळ : सायंकाळी, ७ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- टॉस: सायंकाळी ६:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
Web Summary : India and New Zealand will battle in the T20 World Cup 2026 final at Narendra Modi Stadium, Ahmedabad. Both teams aim to create history, having previously met in ICC finals. Watch live on Star Sports and JioHotstar on March 8th at 7 PM IST.
Web Summary : भारत और न्यूजीलैंड टी20 विश्व कप 2026 के फाइनल में नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद में भिड़ेंगे। दोनों टीमें इतिहास रचने का लक्ष्य रखेंगी, जो पहले आईसीसी फाइनल में मिल चुकी हैं। 8 मार्च को शाम 7 बजे स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव देखें।