Join us

IND vs NZ T20 Live: रिषभ पंत पुन्हा एकदा ठरला फेल! अवघ्या 21 धावांवर भारताचे 3 फलंदाज परतले माघारी 

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:10 IST

Open in App

नेपियर : भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. मात्र भारतीय गोलंदाजांचा वचपा काढून किवी संघाने शानदार पुनरागम केले आहे. न्यूझीलंडच्या संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर भारतासमोर मालिका खिशात घालण्यासाठी 161 धावांचे आव्हान असणार आहे. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली आहे. 

तत्पुर्वी, यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने शानदार सुरूनवात करून देखील किवी संघ गडगडला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना घाम फोडला. न्यूझीलंडने 19.4 षटकांत सर्वबाद 160 धावा उभारल्या आहेत. भारतीय संघाला मालिका खिशात घालण्यासाठी 161 धावांचे आव्हान असणार आहे. 

भारताला 3 मोठे धक्केभारताचे सलामीवीर ईशान किशन आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. किशन (10), रिषभ पंत (11) तर श्रेयस अय्यर खातेही न उघडता तंबूत परतला. सध्या भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा खेळपट्टीवर टिकून आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने 2 बळी घेऊन भारताला मोठे धक्के दिले. तर ॲडम मिल्नेला 1 बळी घेण्यात यश आले.  

ईशान किशन दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. तर रिषभ पंतला तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टीम साउदीने शिकार केले. खरं तर श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही आणि त्याला पहिल्याच चेंडूवर किवी संघाच्या कर्णधाराने बाद केले. सूर्यकुमार यादवने साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश आले. सूर्या 10 चेंडूत 13 धावा करून बाद झाला त्याला ईश सोधीने बाहेरचा रस्ता दाखवला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरिषभ पंतइशान किशनश्रेयस अय्यरन्यूझीलंड
Open in App