Join us

सॉरी जॉन्टी, पण ग्लेन फिलिप्स भारीच; क्रिकेट जगतातील बेस्ट फिल्डरनं असा दिला रिप्लाय

या भाऊची फिल्डिंग बघून तो जॉन्टीपेक्षा लयच भारीये, अशा कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:53 IST

Open in App

Jonty Rhodes React On Best Fielder In Modern Day Cricket :  क्रिकेटच्या मैदानात क्षेत्ररक्षणाचा भारी नजारा दिसला की, जॉन्टी ऱ्होड्स आठवतोच. क्रिकेटच्या मॉर्डन जमान्यात आता ग्लेन फिलिप्सनं दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची जागा घेतलीये. कदाचित तो त्याच्यापेक्षा भारीये, असं क्रिकेट चाहत्यांना वाटू लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात ग्लेन फिलिप्सनं हवेत उडी मारून हवा केली. या भाऊची फिल्डिंग बघून तो जॉन्टीपेक्षा लयच भारीये, अशा कमेंटही पाहायला मिळाल्या. एका नेटकऱ्याने तर ग्लेन फिलिप्सच्या फिल्डिंगचा दर्जा एकदम भारीये हे सांगणारी पोस्ट शेअर केली. 

सॉरी जॉन्टी, पण...

एवढेच नाही तर या क्रिकेट चाहत्याने जॉन्टी ऱ्होड्सला (Jonty Rhodes) सॉरी म्हणत, ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips)हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, अशी कमेंट केली. यावर थेट दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचा रिप्लायही आला. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या पोस्टवर रिप्लाय देताना जॉन्टीनं म्हटलं की, सॉरी कशाला...मलाही ते पटतंय.  

Jonty Rhodes React On Glenn Phillips Best Fielder In Modern Day

 जॉन्टी हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर 

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्स हा क्रिकेट जगतात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक अफलातून झेल टिपले आहेत. त्याच्या फिल्डिंगचा दर्जा एवढा भारी होता की, त्याच्या दिशेनं चेडूं गेला तरी फलंदाज धाव काढायला घाबरायचा. १९९२ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत जॉन्टी ऱ्होड्सनं पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला रन आउट केलेला क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात असेल. हवेत उडी मारत त्याने स्टंपवर झेप घेतली होती. एक दोन मॅच नाही तर प्रत्येक मॅचमध्ये तो अफलातून फिल्डिंगसह क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडायचा.

आता ग्लेन फिलिप्सला लागला मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरचा टॅग

 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ग्लेन फिलिप्सनं कमाल केली. या स्पर्धेत ग्लेन फिलिप्सनं पाकिस्तान कॅप्टन मोहम्मद रिझवान आणि विराट कोहलीचा सेम टू सेम अन् अफलातून कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. फायनलमध्ये शुबमन गिलचा त्याने पकडलेला कॅचही एकदमच भारी होता. त्याचा हा कॅच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील बेस्ट कॅचही ठरला. यावरुनच रंगलेल्या चर्चेत जॉन्टीनंही तो नव्या जमान्यातील सर्वोत्तम फिल्डर असल्याचे मान्य केले आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंडशुभमन गिलविराट कोहलीव्हायरल फोटोज्व्हायरल व्हिडिओ