Join us

विराटनं गांगुलीचा 20 वर्षं जुना रेकॉर्ड मोडत नवा मोठा विक्रम केला, पण फक्त साडेतीन तासच टिकला!

आज विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा 20 वर्षांपूर्वीचा जुना विक्रमही मोडला. यानंतर, महेला जयवर्धनेला मागे टाकत तो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार तर फार साडेतीन तासच टिकू शकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 23:26 IST

Open in App

आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या उपांत्य फेरीत किंग कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 113 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. महत्वाचे म्हणजे कोहलीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रथमच शतक झळकावण्याचा पराक्रम तर केलाच, पण एकदिवसीय सामन्यात 50 वे शतक झळकावत महाविक्रमाचीही नोंद केली. या खेळीच्या जोरावर त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा 20 वर्षांपूर्वीचा जुना विक्रमही मोडला. यानंतर, महेला जयवर्धनेला मागे टाकत तो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार तर फार साडेतीन तासच टिकू शकला. फक्त साडेतीन तासच टिकला कोहलीचा विक्रम! - विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध 117 धावांची खेळी करून एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज झाला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार-फार तर केळव साडेतीन तासच टिकू शकला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावे होता. त्यांने 2007 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 115 धावांची खेळी केली होती. पण आता हा विक्रम न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलच्या नावावर गेला आहे. मिचेलने आजच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 134 धावांची खेळी करून हा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. त्याने 119 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 134 धावा केल्या.

एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्वोच्च धावसंख्या-134 धावा - डॅरिल मिचेल VS भारत117 धावा – विराट कोहली VS न्यूझीलंड, 2023115 धावा – महेला जयवर्धने VS न्यूझीलंड, 2007115 धावा – ग्राहम गूच VS भारत, 1987113 धावा – सईद अनवर VS न्यूझीलंड, 1999111* धावा – सौरव गांगुली VS केनिया, 2003105 धावा – स्टीव स्मिथ VS भारत, 2015

एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताकडून सर्वोच्च धावसंख्या -117- विराट कोहली VS न्यूझीलंड, 2023105- श्रेयस अय्यर VS न्यूझीलंड, 2023111*- सौरव गांगुली VS केनिया, 200385- सचिन तेंडुलकर VS पाकिस्तान, 201183- सचिन तेंडुलकर VS केनिया, 200377- रवींद्र जडेजा VS न्यूझीलंड, 201965- सचिन तेंदुलकर VS श्रीलंका, 199665- एमएस धोनी VS ऑस्ट्रेलिया, 2015

टॅग्स :विराट कोहलीसौरभ गांगुलीभारत विरुद्ध न्यूझीलंड