टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दहाव्या हंगामात टीम इंडिया इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी सामना रंगणार आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाही संघाने सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही. एवढेच नाहीतर घरच्या मैदानात कोणीही जेतेपद पटकावलेले नाही. जे कुणाला नाही जमलं ते करुन दाखवण्याची सुवर्ण संधी टीम इंडियाकडे आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनलसाठी काय असेल भारतीय संघाची रणनिती?
हा डाव साधण्यासाठी भारतीय संघ कोणत्या रणनितीसह मैदानात उतरणार? प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध संघात बदल करण्याचे ठरवले तर कुणाचा पत्ता कट होऊ शकतो? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण...
भारतीय संघात बदल दिसणार?
भारतीय संघ यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी करताना दिसला. पण काही स्टार खेळाडू अपेक्षेला साजेशी कामगिरी करु शकलेले नाहीत. यात अभिषेक शर्मा सगळ्यात अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजीत टीम इंडियाचा सर्वात यशस्वी आणि 'नंबर वन' गोलंदाज वरुण चक्रवर्तीही आपल्या फिरकीची जादू दाखवण्यात अपयशी ठरला आहे. कोणताही संघ विजयाचा सिलसिला कायम असताना संघात बदल करत नाही. पण जर गेम प्लॅन चेंज झालाच तर या दोघांचा पत्ता कट होऊ शकतो. अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंह तर वरुणच्या जागी कुलदीप हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
अभिषेक शर्माचा फ्लॉप शो! वरुण चक्रवर्तीच्या फिरकीतील जादूही 'गायब'
अभिषेक शर्मानं पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळताना फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. या स्पर्धेत तो सातत्याने फिरकीच्या जाळ्यात फसताना दिसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याच्यावर पुन्हा भरवसा ठेवणं, टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. याशिवाय टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकेल अशी चर्चा रंगलेली. पण वरुण चक्रवर्ती चांगलाच महागडा ठरला आहे. मुंबईच्या वानखेडेच्या स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं एक विकेट घेतली. पण ४ षटकांच्या कोट्यात त्याने ६४ धावा खर्च केल्या. त्याने टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात महागडा स्पेल टाकण्याच्या जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली. जयसूर्यानं २००७ च्या हंगामात पाकिस्तानविरुद्ध ४ षटकात ६४ धावा खर्च करत विकेट लेस राहिला होता. या आकडेवारीनंतर वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता कट होऊ शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (यष्टिरक्षक/सलामीवीर), ईशान किशन , सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.