भारतीय संघ घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारा संघच न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. पण टी-२० मालिकेआधी होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ निवडलेला नाही. ११ जानेवारीपासून रंगणाऱ्या वनडे मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरतील हे जवळपास निश्चित आहे. पण या मालिकेतून जसप्रीत बुमराहसह हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह अन् पांड्या दोघेही बऱ्याच दिवसांपासून वनडेपासून दूर
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार सुरु आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतच ते खेळताना दिसतील. हार्दिक पांड्या २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेनंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. जसप्रीत बुमराह २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय वनडे संघाबाहेर आहे.
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची शक्यता
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे सचिव उन्मेष खानविलकर यांनी सांगितले की, श्रेयस अय्यरच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली जाणार आहे अय्यर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पुढील सामने खेळू शकतो का, यावर निर्णय घेतला जाईल. अय्यरला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथील वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. सध्या तो बंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे फिटनेस चाचण्या देत आहे. श्रेयस अय्यरला जर CoE कडून फिटनेस क्लिअरन्स मिळाली, तर अय्यर ३ आणि ६ जानेवारीला होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसू शकते. यादरम्यानंच न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर.
न्यूझीलंड वनडे संघ
मिशेल ब्रेसवेल (कर्णधार), एडी अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, जॅक फोक्स, मिच हे, कायले जेमिसन, निक केली, जेडन लेनाक्स, डारेल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स,. मिशेल रेई, विल यंग.