Join us  

IND vs NZ live T20I : ११ चौकार, ७ षटकार ! Suryakumar Yadavचे दमदार शतक; वर्ल्ड रेकॉर्डसह किवींचे वाजवले बारा, Video

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला आणि त्याने शतकी खेळी करताना किवी गोलंदाजांचे बारा वाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 2:10 PM

Open in App

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - इशान किशन व रिषभ पंत यांना आज सलामीला संधी मिळाली, परंतु भारताला चांगली सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला आणि त्याने शतकी खेळी करताना किवी गोलंदाजांचे बारा वाजवले. कर्णधार हार्दिक पांड्या व श्रेयस अय्यर यांनी सूर्यासोबत समाधानकारक भागीदारी केली. लॉकी फर्ग्युसनने टाकलेल्या १९व्या षटकात सूर्याने २२ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात सूर्याला स्ट्राईक मिळाली नाही, परंतु त्याने त्याचे काम चोख बजावले. टीम साऊदीने २०व्या षटकात हॅटट्रिक घेतली.

 OH NO! श्रेयस अय्यर स्वतःच्याच पायाने 'बेल्स' पाडल्या, किवींना दिली आयती विकेट 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात रिषभने ( ६) फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर तो  झेलबाद झाला. टीम साऊदीने अप्रतिम रिटर्न कॅच घेताना भारताला ३६ धावांवर पहिला धक्का दिला.  सूर्यकुमार यादवने फटकेबाजीने सुरुवात. इश सोढीने त्याच्या पहिल्याच षटकात इशानला पायचीत केले होते, परंतु भारतीय फलंदाजाने DRS घेतला अन् मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला. चेंडू स्टम्पच्या अगदी इंचभर जवळून जाताना रिल्पेत दिसला. पण, सोढीने पुढच्या षटकात इशानला माघारी पाठवला. ३१ चेंडूंत ३६ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करणाऱ्या इशानचा झेल साऊदीने टिपला.  श्रेयस अय्यरने पहिल्याच चेंडूवर सरळ चौकार खेचला आणि भारताने १० षटकांत २ बाद ७५ धावा केल्या होत्या. सूर्याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आणि श्रेयसनेही त्याला साथ दिली. या दोघांनी सोढीच्या षटकात १५ धावा चोपल्या. या दोघांच्या २१ चेंडूंवरी ३९ धावांच्या भागीदारीचा शेवट दुर्दैवी ठरला. श्रेयस अय्यर ( १३) हिट विकेट झाला. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर श्रेयसने मागे येऊन फटका मारला, परंतु त्याचा पाय यष्टींवर आदळला अन् बेल्स पडल्या. लोकेश राहुल, हर्षल पटेल व हार्दिक पांड्या यांच्यानंतर ट्वेंटी-२०त हिटविकेट ठरणारा श्रेयस चौथा भारतीय फलंदाज ठरला. सूर्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  

सूर्याने ४९ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील दुसरे शतक पूर्ण केले. कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन शतकं झळकावणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय ठरला. हार्दिकने ( १३)  चौथ्या विकेटसाठी सूर्यासोबत ४० चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली. हार्दिक, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदरला त्याने बाद केले. सूर्या ५१ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १९१ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादव
Open in App