Join us

Video: मोहम्मद शमी is Back! पहिल्याच चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या ओपनरचा त्रिफळा, फलंदाजही अवाक्

चार सामन्यांत संधी न मिळालेल्या शमीने आज संधीचं सोनं केलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 15:12 IST

Open in App

World Cup 2023 IND vs NZ Live Updates : विश्वचषक स्पर्धेत आज 'टेबल टॉपर्स' न्यूझीलंड आणि भारत एकमेकांशी भिडले आहेत. धरमशालाच्या मैदानात दोन तुल्यबळ संघात सामना रंगला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. भारताच्या संघात व्यवस्थापनाने दोन बदल केले. त्यात शार्दुल ठाकूरच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद शमीने संघातील निवड योग्य असल्याचे पहिल्याच चेंडूवर दाखवून दिले.

भारतीय संघाने चौथ्या षटकात पहिला बळी मिळवला. मोहम्मद सिराजने डेवॉन कॉन्वेला बाद केले. श्रेयस अय्यरने त्याचा बळी झेल घेतला. त्यानंतर बुमराहच्या जागी गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. सामन्यातील त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शमीने सलामीवीर विल यंगचा त्रिफळा उडवला. शमीला पहिल्या चार सामन्यात संधी मिळाली नव्हती. पण आजच्या सामन्यात संधी मिळताच त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत यंगला बाद केले.

  

भारत- रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, राचिन रवींद्र, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

दरम्यान, आतापर्यंतच्या स्पर्धेत दोनही संघ अजिंक्य आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात विजय मिळवले आहेत. दोन्ही संघांचे ८ गुण असूनही नेट रनरेटच्या बळावर न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानी आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपमोहम्मद शामीभारतहार्दिक पांड्या