Anushka Sharma Reaction Shreyas Iyer Drop Catch IND vs NZ Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदाची लढाई रंगली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात रंगलेला हा सामना पाहण्यासाठी कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसह स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही दुबईच्या स्टेडियम स्टँडमध्ये उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. मॅच वेळी कोहलीच्या फिल्डवरील कामगिरीसह त्याच्या अंदाजामुळे स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काची अदाकारी हा मुद्दा नेहमीच चर्चेचा ठरतो. पण यावेळी कोहलीला हायबाय करण्यासोबत श्रेयस अय्यरनं कॅच सोडल्यावर अनुष्कानं दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हिडिओ बघून म्हणाल, अनुष्का तर कोहलीची बहिण निघाली...काय आहे प्रकरण?
न्यूझीलंडच्या डावातील आठव्या षटकात रचिन रवींद्रनं एक मोठा फटका खेळला. हवेत मारलेला हा फटका फायनल इनिंगमधील त्याची खेळी खल्लास करणारा ठरेल, असे वाटत होते. श्रेयस अय्यरसारखा तगडा क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावत आला म्हणजे कॅच होणारच असे सर्वांना वाटले. त्यात अनुष्का शर्माही होती. पण श्रेयसच्या हातून तो कॅच सुटला. त्याने पूर्ण प्रयत्न केले पण हातून शेवटी कॅच निसटला. यावेळी कॅमेरा अनुष्कावरही फिरला त्यावेळी तिची रिअॅक्शन बघण्याजोगी होती. हा कॅच सुटल्यावर तिच्या तोंडून शिवी निघलीये असं व्हिडिओमध्ये दिसते. नेमकं ती काय म्हटली त्याचा अंदाज तुम्ही व्हिडिओ बघून लावू शकता. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा हा काही बोलायचं झालं तर त्याच्या तोंडून एखादी शिवी येतेच. अगदी तोच सीन अनुष्काच्या बाबतीत पाहायला मिळाल्यामुळे अनुष्का तर रोहितची बहिण निघाली असा एक सीन मॅच दरम्यान क्रिकेट झाल्याचे पाहायला मिळाले.
विराट अनुष्काचा यांच्यातील खास सीनही चर्चेत
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्या वेळी विराट कोहली आणि अनुष्काचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. टॉस गमावल्यावर भारतीय संघ फिल्डिंगसाठी मैदानात उतरला. मैदानात एन्ट्री मारताना विराट कोहली पत्नी अनुष्काला हातवारे करून इशारे करताना दिसला. त्याला अनुष्काही प्रतिसाद देताना दिसली. दोघांच्यातील केमिस्ट्रीचा हा सीनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Web Title: IND vs NZ Final Virat Kohli Wife And Bollywood Actress Anushka Sharma Reaction Shreyas Iyer Drop Catch Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.