IND vs NZ Final Abhishek Sharma and Sanju Samson Hit Show : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. या जोडीनं पॉवर प्लेमध्येच विक्रमी भागीदारी रचत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. अभिषेक शर्मानं अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या बाजूला संजूनंही धमाकेदार फटकेबाजीचा नजराणा पेश केला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ९२ धावा कुटल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील ही सर्वोच्च धावंसख्या ठरली. त्याआधी त्यांनी टीमकडून सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्डही नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानी जोडीच्या विक्रमाला सुरुंग
संजू आणि अभिषेक शर्मा या जोडीनं पहिल्या षटकातच संघाच्या धावफलकावर ५० धावा लावल्या. भारताकडून २०२१ नंतर पहिल्यांदाच सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी रचली. एवढेच नाही तर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमधील सलामी जोडीनं केलेली ही सर्वोच्च भागीदारीही ठरली. याआधी २००९ च्या हंगामात कमरान अकमल आणि शाहझाइब हसन या जोडीनं ४८ धावांची भागीदाीर केल्याचा रेकॉर्ड होता. संजू-अभिषेकनं हा विक्रम मोडीत काढला.
IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल
टी२० विश्वचषकात पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड
९२/० - भारत विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, २०२६ अंतिम सामना
९२/१ - वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान, ब्रिजटाऊन, २०२४
९१/१ - नेदरलँड्स विरुद्ध आयआरई, सिल्हेट, २०१४
८९/३ - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुंबई वेस्ट इंडिज, २०१६
८६/१ - भारत विरुद्ध नामांकित संघ, दिल्ली, २०२६