दुबईच्या मैदानात रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल लढतीत न्यूझीलंडच्या संघानं टीम इंडियासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा यशस्वी पाठलाग करुन २५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडी मैदानात उतरली. टीम इंडियाला संघाला सपोर्ट देण्यासाठी दुबईत चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. भारतीय संघच यंदाची ट्रॉफी उचलणार असा उत्साह घेऊनच चाहते स्टेडियमवर पोहचलेत. भारतीय संघच शंभर टक्के जिंकणार हे सांगणाऱ्या एका महिला क्रिकेट चाहतीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. तिनं ज्या अंदाजात भारतीय संघ जिंकणार हे सांगितेल ते एकदम खास आहे.
लेडी फॅनची कडक कमेंट, रोहितचं नाव घेत म्हणाली..
एएनआयनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका चाहतीला भारतीय संघ २५२ धावांचा यशस्वी पाठलाग करून मॅचसह ट्रॉफी जिंकणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रिप्लाय देताना महिलाने भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्माच नाव घेत खास अंदाजात रिप्ला दिल्याचे पाहायला मिळाले. मी फक्त दोन गोष्टी मानते, एक म्हणजे 'कर्मा' अन् दुसरी म्हणजे 'रोहित शर्मा' असं म्हणत भारतीय संघच ट्रॉफी जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. तिची कमेंट एकदम खास अन् कडक अशीच आहे. त्यामुळेच तिचा हा रिप्लाय चर्चेचा विषय ठरतोय.