Daryl Mitchell Hundred : राजकोटच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात डॅरिल मिचेलनं शतकी खेळीसह टीम इंडियातील गोलंदाजांचे खांदे पाडले. विराट कोहलीप्रमाणेच न्यूझीलंडचा हा बॅटर मागील काही दिवसांपासून सातत्याने कमालीची कमगिरी करत आहे. वनडे कारकिर्दीतील ८ व्या शतकी खेळीसह त्याने संघाला वनडे मालिकेत पुनरागमन करून दिले. एवढेच नाही तर त्याचे हे शतकामुळे किंग कोहलीचं अव्वलस्थान धोक्यात आलं आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डॅरिल मिचेलची अखेरच्या ६ वनडेतील कामगिरी
- ७८* धावा विरुद्ध इंग्लंड
- ५६* धावा विरुद्ध इंग्लंड
- ४४ धावा विरुद्ध इंग्लंड
- ११९ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज
- ८४ धावा विरुद्ध भारत
- १०१* धावा विरुद्ध भारत (आज)
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
विराट कोहलीचं अव्वलस्थान धोक्यात! ते कसं?
दुसऱ्या वनडे सामन्याआधी ICC ने जाहीर केलेल्या वनडे रँकिंगमध्ये किंग कोहली आपलाच सहकारी रोहित शर्माला मागे टाकून अव्वलस्थानी विराजमान झाला. त्याच्यापाठोपाठ डॅरिल मिचेलचा नंबर लागतो विराट कोहलीच्या खात्यात ७८५ रेटिंग पॉइंट्स असून त्याच्या पाठोपाठ मिचेल ८८४ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या वनडेत विराट फक्त २३ धावांवर बाद झाल्यावर न्यूझीलंड बॅटरनं शतकी खेळीसह ICC क्रमवारीतील नंबर वनची दावेदारी ठोकली आहे. जर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात मिचेलचा जलवा कायम राहिला तर तो पुन्हा एकदा नंबर वन विराजमान होईल.