Join us

टीम इंडियाचा अनलकी कॅप्टन! रोहितवर टॉस वेळी दहाव्यांदा आली ही वेळ

तो वनडेत सलग १० वेळा नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:47 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात रोहित शर्मानं पुन्हा एकदा टॉस गमावला. यासह भारतीय कॅप्टनच्या रुपात त्याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. तो वनडेत सलग १० वेळा नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. यासह भारतीय संघाच्या नावे वनडेत सलग १३ वेळा टॉस गमावल्याचा रेकॉर्डची नोंद झालीये. अन्य कोणत्याही संघावर अशी वेळ आलेली नाही. याआधी नेदरलँडस संघाच्या नावे सलग ११ वेळा नाणेफेक गमावण्याचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड आता टीम इंडियाच्या नावे आहे. नेदरलँडसच्या संघानं २०११ ते २०१३ दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ वेळा टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टॉस गमावल्यावर मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड चांगला, पण...

 रोहित शर्मा टॉस वेळी अनलकी ठरत आहे. पण दुसरीकडे टॉस गमावल्यावर मॅच भारतीय संघाने जिंकल्याचेही पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो तोरा कायम राखण्याचे आव्हान आहे. कारण पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने आघाडीच्या ३ विकेट्स अवघ्या ३० धावांत गमावल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल २ (७), रोहित शर्मा १५ ( १७) आणि विराट कोहली ११ (१४) यांनी स्वस्तात आपल्या विकेट गमावल्या. 

आंतरराष्ट्रीय वऩेत कुणाच्या नावे आहे सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय वनडेत सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिज दिग्गज ब्रायन लाराच्या नावे आहे. लारानं वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना ऑक्टोबर १९९८ ते मे १९९९ या कालावधीत १२ सलग बारा वेळा टॉस गमावला होता. नेदरलँडसचा कर्णधार पीटर बोर्रेन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मार्च २०११ ते ऑगस्ट २०१३ या कालावधीत ११ वेळा टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ मग रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्मानं नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत सलग १० वेळा टॉस गमावला आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघ