तमाम भारतीय अन् सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता रविवारी होणाऱ्या भारत न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना दुबईतील वातावरण काय? असा प्रश्नही काहींना पडला असेल. या प्रश्नाच उत्तर काहीजण दुबईत सध्या टीम इंडियाची वारं वाहतंय अशा टोनमध्येही देतील. अन् ते खरंही आहे. कारण फायनल लढतीत भारतीय संघासाठी अनेक जमेच्या बाजू आहेत. दोन्ही संघ ट्रॉफी उचलण्याची हौस बाळगून मैदानात उतरतील. पण पाऊस पडला तर काय? चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत राखीव दिवस आहे का? आणि जर तोही दिवस वाया गेला तर कसा ठरवला जातो विजेता? यासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषदेनं काही नियम आहेत. इथं जाणून घ्या सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पावसामुळे भारतावर आली होती संयुक्त विजेतेपद मिरवण्याची वेळ
आता पाऊस पडला तर काय? राखीव दिवस आणि विजेता घोषित करण्यासंदर्भातील नियम जाणून घेण्यामागची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तानच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात काही लढती या पावसामुळे रद्द झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरं कारण हे की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एक फायनल अशीही झालीये ज्यात पावसामुळे संयुक्त विजेता घोषित करावा लागला होता. त्यावेळी टीम इंडियात फायनल खेळली होती. २००२ मध्ये भारत-श्रीलंका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल खेळवण्यात आली होती. पण पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनल लढतीत पावसाचा व्यत्यय आला तर काय?
भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात पाऊस झाला तर आयसीसीच्या नियमानुसार, षटकातील कपातीसह किमान २०-२० षटकाचा सामना खेळवणं अपेक्षित आहे. याशिवाय राखीव दिवसही आहे. कारण स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी सामना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. मागील कामगिरीच्या आधारावर चॅम्पियन्स ठरवला जात नाही. रविवारी, ९ मार्चला पावसाचा व्यत्यय आलाच तर १० मार्च हा अं राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यातही अडथळा आलाच तर मात्र संयुक्त विजेता घोषित करण्याचा नियम लागू होईल.
२५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल भारतीय संघ
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या नवव्या हंगामात भारतीय संघ पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. याआधी २००० च्या हंगामात भारतीय संघानं पहिल्यांदा या स्पर्धेची फायनल खेळली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली होती. या पराभवाची परतफेड करून विक्रमी तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याची संधी भारतीय संघाकडेआहे. २००२ आणि २०१३ मध्ये भारतीय संघानं ही ट्रॉफी जिंकली असून २०१७ च्या हंगामात पाकिस्तानच्या संघानं टीम इंडियाला पराभूत केले होते.