IND vs NZ, Final : 'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं!

या मिस्ट्री स्पिनरला खेळायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची 'दहशत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:35 IST2025-03-07T15:33:38+5:302025-03-07T15:35:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Champions Trophy 2025 Final New Zealand Coach Gary Stead Highlights Varun Chakravarthy Threat | IND vs NZ, Final : 'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं!

IND vs NZ, Final : 'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल आधी न्यूझीलंडच्या ताफ्यातील फलंदांजांमध्ये भारतीय गोलंदाजांची धडकी भरलीये. वरुण चक्रवर्तीच चक्रव्यूह भेदायचं कसं हा याच विचारमंथन ते करत आहेत. भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या फायनलआधी संघाचे कोच गॅरी स्टीड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य करताना मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचा सामना करणं सर्वात कठीण असल्याची गोष्टही बोलून दाखवलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मारला होता पंजा

एका बाजूला न्यूझीलंडच्या संघातील प्रमुख गोलंदाज मॅट हेन्रीच्या फिटनेसची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा सामना कसा करायचा याची चिंता संघाला सतावतीये. वरुण चक्रवर्तीनं साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत पाच विकेट्स घेत सामना फिरवला होता. त्याने ४२ धावा खर्च करून ५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीनं पंजा मारून अर्धा भारतीय संघ तंबूत धाडला. त्याला कडक रिप्लाय देताना वरुण चक्रवर्तीनं आपल्या फिरकीतील मॅजिक दाखवून दिले होते. 

तो आमच्यासमोरील सर्वात मोठा धोका

न्यूझीलंड माजी लेग स्पिनर आणि विद्यमान कोच गॅरी स्टीड प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय गोलंदाजाबद्दल म्हणाले की, "वरुण चक्रवर्ती हा एक सर्वोत्तम गोलंदाज आहे, यात कोणतीही शंका नाही. मागच्या मॅचमध्ये त्याने आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. फायनलमध्ये तो आमच्यासाठी सर्वात मोठा धोका वाटतो. त्याचा सामना कसा करायचा? त्याच्या गोलंदाजीवर धावा कशा कराव्यात, याबद्दल आम्ही विचार करत आहोत."

रचिनसह केन विल्यमसन हात त्यांचा दिलासा

यावेळी स्टीड यांनी युवा अष्टपैलू रचिन रवींद्र याचे कौतुक केले. रचिन हा सहज धावा काढण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताने तो स्पिन गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याच्याशिवाय केन विल्यमसनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मोठ्या स्पर्धेत त्याने अनेकदा संघासाठी चांगली कामगिरी केली असून यावेळीही तो सर्वोत्तम खेळ करून दाखवेल, असा विश्वास न्यूझीलंड कोच स्टीड व्यक्त केलाय. 
 

Web Title: IND vs NZ Champions Trophy 2025 Final New Zealand Coach Gary Stead Highlights Varun Chakravarthy Threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.